जेएनएन, मुंबई. Maharashtra Political News: महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना स्वतंत्र विभाग दिले. मात्र आता अर्थमंत्री अजित पवार यांच्या विभागाची सर्व फाईली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तपासणीसाठी जाऊ लागल्या आहेत. महायुतीने जुनी परंपरा अजूनही कायम ठेवली आहे.

फडणवीस-शिंदे यातील दुरावा कमी झाला

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकडे शिवसेना पक्षाच्या सर्व मंत्रीच्या विभागाच्या फाइली जात होते. देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार एकनाथ शिंदे सरकारमध्ये कामकाज होत होते. त्याच पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारमध्ये अजित पवार आणि त्यांच्या मंत्र्यांच्या सर्व फाइली एकनाथ शिंदेंकडे जात असल्याने फडणवीस-शिंदे यातील दुरावा कमी झाल्याची जोरदार चर्चा राजकारणात सुरू आहे.

शिंदेंकडे फाइल पाठविण्याचे आदेश 

अजित पवार यांच्या विरोधात एकनाथ शिंदे विभागाच्या मंत्री आणि आमदाराने तक्रार केली होती. त्याच तक्रारीवर देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंकडे फाइल पाठविण्याचे थेट आदेशच काढले आहेत. फडणवीस यांच्या या आदेशामुळे शिंदे गटाच्या मंत्री आणि आमदारला दिलासा मिळाला आहे. तर अजित पवार यांच्या अर्थखात्यामधील कामकाजवर एकनाथ शिंदे यांची करडी नजर बसली आहे. यामुळे अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री अस्वस्थ झाले आहेत. फडणवीस आणि एकनाथ शिंदेमध्ये दुरावा असल्याची चर्चा होती त्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे.

    राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

    भविष्यात अजित पवार यांना निधी आणि निर्णय घेण्याआधी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घ्यावा लागेल. देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने अजित पवार गटाकडे नियंत्रण तर एकनाथ शिंदे गटाला अधिकारी दिल्याची जोरदार चर्चा सद्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.