मुंबई. अजित पवार अपघात प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याकडून अनेक पत्रकार परिषदा व प्रेझेन्टेशन घेऊन अनेक दावे व आरोप करण्यात आले आहेत. या अपघाताबद्दल सातत्याने संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात रोहित पवारांनी आज पुन्हा एकदा एक पत्रकार परिषद घेत एक फोटो दाखवला आहे. या फोटोमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या फोटोमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मफलर घातलेली दिसत आहे. काही महिन्यापूर्वी रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघातामागे मफलर परिधान करणाऱ्या नेत्यांचा हात असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर तो नेता कोण, यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते.
अजितदादांच्या अपघातामागे असलेल्या VSR कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील एक मफलरधारी नेता करत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी या आधी केला होता. त्या नेत्याचं नाव आता रोहित पवारांनी जाहीर केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच VRS कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला असा आरोप रोहित पवार यांनी केला. देवेंद्र फडणवीस हे व्ही के सिंहच्या जयपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. त्यांनीच या कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. यामध्ये जर चूक असेल तर सरकारने तपास करावा, असं आव्हानही रोहित पवार यांनी केलं.
28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार यांचे विमान बारामती विमानतळाजवळ कोसळले व या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याकडून या अपघाताबद्दल सातत्याने संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात आज पुन्हा एकदा एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी एक फोटो दाखवला आहे. या फोटोमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या फोटोमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मफलर घातलेली दिसत आहे.
काय म्हणाले रोहित पवार -
पत्रकार परिषदेत रोहित पवार म्हणाले की, अपघात की घातपात? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न एक कुटुंबीय म्हणून आम्ही करतोय. आमच्याकडे पोलीस व्यवस्था, सीबीआय नाही, पण आमच्याकडे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. आजपर्यंत अनेकांनी दादांच्या अपघातासंबंधी माहिती दिली. मी आतापर्यंत पाच प्रेझेंटेशन दिले. आताही ही महत्त्वाची माहिती सांगतोय. मात्र तपास केला जात नाही.
व्ही. के. सिंह आणि व्हीएसआर कंपनीला वाचवणारे देवेंद्र फडणवीस हेच नेते आहेत असं आमचं ठाम मत आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, यांच्याकडे सत्ता आहे, सीआयडी आहे. पंतप्रधान त्यांचं ऐकतात, सीबीआय त्यांचं ऐकू शकते. पण आतापर्यंत तपास का होत नाही? याचं मुख्य कारण म्हणजे आपले मुख्यमंत्री फडणवीस हे व्ही. के. सिंह याचे निकटवर्तीय आहेत, व ते त्यांना वाचवत आहेत. असं आमचं ठाम मत आहे.
जर मी स्वतःच्या काकाला न्याय देऊ शकत नसेल आणि कॉम्प्रोमाईज करत असेल तर मी सामान्य नागरिकाला न्याय देऊ शकेल का? मी हे सर्व समोर आणतोय याचे परिणाम माझ्या राजकीय कारकिर्दीवरही होऊ शकतात. पण मला त्याची चिंता नाही. मी ज्या व्यक्तीच नाव घेतोय ती अजित दादांच्या अपघातामागे आहे असे म्हणत नाहीये पण संशयाच्या भोवऱ्यात आलेल्या कंपनीला ही व्यक्ती नक्कीच वाचवते आहे.
रोहित पवार म्हणजे प्रसिद्धीची हाव असलेले हावरट व्यक्तिमत्त्व! आज स्व. अजितदादांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाचे महत्त्व कमी व्हावे, म्हणून केलेला हा उपक्रम, दुसरे काहीही नाही. रोहित सिंग आणि त्याची व्हीएसआर कंपनी ही 2013 पासून राजकीय पक्षांना आणि राज्य सरकारला विमान सेवा देत आहे. त्यामुळे केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाही, तर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या विमानाने प्रवास केला. केवळ रोहित सिंग याच्याशी नाही, तर अनेक वैमानिकांसोबत त्यामुळे सार्याच नेत्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अशात कुणाच्या लग्नाला जाणे, ही सामान्य बाब आहे. अनेक वैमानिक आणि सहवैमानिकांसोबत त्यामुळे सार्याच नेत्यांचे फोटोही आहेत. एका फोटोवरुन असे आरोप करणे, हे अत्यंत खालच्या स्तराचे राजकारण आहे. रोहित पवारांनी आज जे केले, त्यातून त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांचे संस्कार आणि महाराष्ट्राच्या प्रगल्भ राजकीय संस्कृतीला मातीत घातले आहे. याचा करावा तितका धिक्कार कमी आहे. आमची अजून एक मागणी आहे की, रोहित पवार यांच्या या आरोपांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) आणि आदरणीय शरद पवार साहेबांनीही आपली भूमिका तातडीने स्पष्ट केली पाहिजे. @Dev_Fadnavis @PawarSpeaks
— Navnath Kamal Uttamrao Ban (@NavnathBanBJP) November 16, 2026
भाजपची प्रतिक्रिया समोर -
दरम्यान भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी रोहित पवारांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. आज स्व. अजितदादांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाचे महत्त्व कमी व्हावे, म्हणून केलेला हा उपक्रम, दुसरे काहीही नाही.
रोहित सिंग आणि त्याची व्हीएसआर कंपनी ही 2013 पासून राजकीय पक्षांना आणि राज्य सरकारला विमान सेवा देत आहे. त्यामुळे केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाही, तर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या विमानाने प्रवास केला. केवळ रोहित सिंग याच्याशी नाही, तर अनेक वैमानिकांसोबत त्यामुळे सार्याच नेत्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अशात कुणाच्या लग्नाला जाणे, ही सामान्य बाब आहे. अनेक वैमानिक आणि सहवैमानिकांसोबत त्यामुळे सार्याच नेत्यांचे फोटोही आहेत. एका फोटोवरुन असे आरोप करणे, हे अत्यंत खालच्या स्तराचे राजकारण आहे.
