जेएनएन, मुंबई. Sangli News: सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील इस्लामपूर गावाचे नाव हे आता ईश्वरपूर असे करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य सरकारकडून मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. याबाबतचा प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी विधिमंडळाने मंजुरी दिली आहे, असे ते म्हणाले. 

इस्लामपूर यांच्या नाव बदलवून ईश्वरपूर करावे असा प्रस्ताव राज्य सरकारकडून मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत मांडला. राज्य सरकार कडून इस्लामपूर यांच्या नाव बदलवून ईश्वरपूर करण्याचा  केंद्र सरकारकडे पाठविणाऱ्या प्रस्तावाला विधानसभेत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती छगन भुजबळांनी सभागृहात दिली.  

केंद्र सरकारने परवानगी मिळाल्यावर

केंद्र सरकाराच्या सर्व मार्गदर्शक सूचनाचे पालन करुन याबाबतचा एक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तेथील इस्मालपूर येथील जनभावना लक्षात घेऊन हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर या गावचे नाव हे ईश्वरपूर करण्यात येईल, असंही यावेळी त्यांनी सांगितलं. मागील काही दिवसांपासून ही मागणी सातत्याने होत होती. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला, असं भुजबळांनी यावेळी सांगितले.

नाव बदलल्याने परिस्थिती बदलत नाही

    इस्लामपूरचे ईश्वरपूर असे नामकरण करण्याबाबत समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी प्रतिक्रिया दिली. "ज्या शहराचे नाव तुम्ही बदलत आहात त्याचा विकास करा; नाव बदलल्याने परिस्थिती बदलत नाही...", असं ते म्हणाले.

    हेही वाचा - Maharashtra Vidhan Bhavan Clash: विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही; राज ठाकरेंकडून खरपूस समाचार