जेएनएन, मुंबई: मध्य रेल्वेच्या अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान सोमवारी रात्री दोन वेगवेगळ्या मेल एक्सप्रेस गाड्यांवर दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनांमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या दगडफेकीत यात्री जखमी झाले नाही.

काय आहे घटना!

अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान रेल्वे मार्गावर काही अज्ञात व्यक्तींनी प्रवासादरम्यान दोन गाड्यांवर दगडफेक केली. यात यात कोयना एक्सप्रेस (Koyna Express) आणि साईनगर शिर्डी एक्सप्रेस (Sainagar Shirdi Express) या गाड्यांचा समावेश असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. रात्री उशिरा घडलेल्या या घटनांमध्ये काही गाड्यांच्या खिडक्या फोडल्या गेल्या असून, काही डब्यांच्या काचा फुटल्या आहेत. 

रेल्वे पोलिसांनी केली पाहणी

रेल्वे प्रवाशांनी या घटनेबाबत तत्काळ रेल्वे पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर कल्याण जीआरपी आणि आरपीएफ यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. दोन्ही पथकांनी मिळून या दगडफेक प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.