जेएनएन, मुंबई. Maharashtra Govt News: महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने मराठी भाषेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील सर्व व्यावसायिक वाहनांवर मराठी भाषेत सामाजिक संदेश लिहणे बंधनकारक करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे ट्रक, बस, रिक्षा, टेम्पो सहित व्यावसायिक वाहनांवर मराठी भाषेत सामाजिक संदेश बंधनकारक केले आहे.
30 मार्चपासून बंधनकारक
राज्यातील नोंदणीकृत सर्व व्यावसायिक वाहनांवर मराठी भाषेतच सामाजिक संदेश लिहावे लागणार आहेत. 30 मार्च 2025 गुढीपाडवा पासून हा नियम सर्व व्यावसायिक वाहनांना काटेकोरपणे पळावा लागणार आहे, अशी माहिती परिवहन विभागाने दिली आहे.
हेही वाचा - Politcs: चार जागांवरून तुटली होती भाजप-शिवसेनेची युती, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली 2014 ची गोष्ट
सामाजिक संदेश मराठी भाषेतच असले पाहिजे
परिवहन विभागाच्या निर्णयानुसार राज्यात सर्व व्यावसायिक वाहनांवर ट्रक, बस, रिक्षा, टेम्पोवर मराठी भाषेत सामाजिक संदेश लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे संदेश शिक्षण, पर्यावरण संरक्षण आणि आरोग्य जागरूकता यासारख्या विषयांवर आधारीत असणार आहे.
हेही वाचा - डेटा सेंटर, स्टार्टअप व इनोव्हेशन क्षेत्रात महाराष्ट्र देशात अव्वल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मराठी भाषेला सन्मान मिळणार
व्यावसायिक वाहनांवर सामाजिक संदेश मराठी लिहल्याने मराठी भाषेला सन्मान मिळणार असल्याची भावना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. सध्या राज्यात नोंदणीकृत अनेक व्यावसायिक वाहनांवर हिंदी किंवा इतर भाषांमध्ये सामाजिक संदेश, जाहिराती आणि शैक्षणिक माहिती लिहिली जाते. सामाजिक संदेश, जाहिराती आणि शैक्षणिक माहिती मराठीत प्रदर्शित केली गेली तर महाराष्ट्रातील लोकांना अधिक उपयुक्त माहिती मिळेल आणि मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार होईल. याशिवाय मराठी भाषेलाही योग्य तो सन्मान मिळेल.