जेएनएन, मुंबई. Maharashtra Govt Increase Disabilities Persons Benefit: राज्याचे पावसाळी अधिवेशनाचा संपले. शेवटच्या दिवशीच्या कामकाजात मंत्री अतुल सावे यांनी एक महत्त्वाचे निवेदन केले आहे. त्यांनी सभागृहात दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती दिली.
दरमहा अर्थसहाय्य 1500 रुपयांवरून थेट 2500 पर्यंत वाढवण्याचा निर्णय
राज्यातील लाखो दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने दिव्यांगांसाठी दिले जाणारे दरमहा अर्थसहाय्य 1500 रुपयांवरून थेट 2500 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत दिली. याबाबतचे निवेदन त्यांनी विधानसभेत आज केले.
या योजनेतून मिळणार लाभ
या निर्णयामुळे राज्य पुरस्कृत 'संजय गांधी निराधार अनुदान योजना', 'श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना' आणि केंद्र पुरस्कृत 'इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्य निवृत्ती वेतन योजना' अशा योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा अधिक मदत मिळणार आहे, असं ते म्हणाले.
दिव्यांग बांधवांसाठी दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्य मदतीत १ हजारांची वाढ..
— Atul Save (@save_atul) July 18, 2025
राज्यातील लाखो दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने दिव्यांगांसाठी दिले जाणारे दरमहा अर्थसहाय्य ₹१५००/- वरून थेट ₹२५००/-… pic.twitter.com/K6Mu7nnaE1
दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक सुसह्य होण्यास मदत होणार
या वाढीमुळे दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक सुसह्य होण्यास मदत होणार असून शासनाच्या सामाजिक उत्तरदायित्वाची एक सकारात्मक पावती म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं.