जेएनएन, मुंबई/नवी दिल्ली: राज्यातील महाप्रलयामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात शेती उद्ध्वस्त झाली असून शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर (Devendra Fadnavis Delhi tour) आहेत. शेतकऱ्यांसाठी भरीव मदत मिळवण्याच्या दृष्टीने ते केंद्रीय नेत्यांशी चर्चा केली आहे.
शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी विशेष पॅकेज मिळावे
फडणवीस दिल्लीतील चर्चेत केंद्र सरकारसमोर पूरग्रस्त भागातील नुकसानीचा सविस्तर अहवाल मांडला आहे. राज्याला अधिकाधिक निधी मिळावा आणि शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी विशेष पॅकेज मिळावे, यासाठी ते पंतप्रधान कार्यालयासह इतर ही मंत्र्यांची भेट घेत आहेत.
NDRF च्या निधीतून भरीव मदत मिळण्याची आशा
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी कालच मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निवेदन दिले होते. या निवेदनात संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF च्या निधीतून भरीव मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा - Marathwada Rain Update: मराठवाड्यातील ‘त्या’ कुटुंबियांना दिलासा, प्रत्येकी 4 लाखांची मदत जाहीर