जेएनएन, मुंबई. अंबरनाथ नगर परिषदेतील काँग्रेसने निलंबित केलेल्या 12 नगरसेवकांनी आज नवी मुंबई येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.  याप्रसंगी वन मंत्री गणेश नाईक यांच्याह अनेक जण उपस्थित होते.

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केलेल्या नगरसेवकांची यादी

  1. प्रदीप नाना पाटील
  2. दर्शना उमेश पाटील
  3. अर्चना चरण पाटील
  4. हर्षदा पंकज पाटील
  5. तेजस्विनी मिलिंद पाटील
  6. विपुल प्रदीप पाटील
  7. मनीष म्हात्रे
  8. धनलक्ष्मी जयशंकर
  9. संजवणी राहुल  देवडे
  10. दिनेश गायकवाड
  11. किरण बद्रीनाथ राठोड
  12. कबीर नरेश गायकवाड

शिंदेंना भाजपाने दिला मोठा धक्का 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात शिंदेंना भाजपाने मोठा धक्का दिला आहे. अंबरनाथ नगरपरिषदेत, शिवसेना सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आली पण बहुमतापासून दूर राहिली आहे.

31 डिसेंबर रोजी स्थानिक भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर निलंबित काँग्रेसचे बारा नवनिर्वाचित नगरसेवक, भाजपचे 14, राष्ट्रवादीचे चार आणि एक अपक्ष नगरसेवक एकत्र आले आणि त्यांनी स्थानिक आघाडी स्थापन केली आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना या घडामोडीची माहिती देणारे पत्र देण्यात आले.

    20 डिसेंबर रोजी झालेल्या 60 सदस्यीय परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेला 27 जागा मिळाल्या, बहुमतापासून फक्त चार जागा कमी पडल्या. भाजपला 14 जागा, काँग्रेसला 12, राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या, तर 2  अपक्षही निवडून आले.