जेएनएन, मुंबई. Maharashtra Monsoon Session 2026: महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन 22 जून रोजी सुरू होऊन 10 जुलै रोजी संपेल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने सोमवारी दिली. 

राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाज सल्लागार समितीच्या (बीएसी) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार उपस्थित होते, असे अधिकाऱ्याने सांगितले.

ही मुद्दे गाजणार

  • शेतकरी आत्महत्या 

राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने कर्ज माफी देण्याची घोषणा केली आहे. मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. त्यातच खरीपाची पेरणी जवळ आली असून अजून पैसे मिळाले नाहीत. तसंच, सरकारकडून सरकसट कर्जमाफी करण्यात आली नाही, या मुद्यावरून विरोधक सरकारला घेण्याची शक्यता आहे. 

  • लाडकी बहीण योजना

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेक लाभार्थी अपात्र झाले आहेत. तसेच, लाभार्थ्यांना लाभ देण्यात उशीर होत आहे. तसंच, या योजनेचा हप्ता हा 1500 वरून 3000 करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे यावरून विरोधक आणि महायुती सरकार आमनेसामने येण्याची शक्यता आहे. 

  • कांदा बाजारभाव प्रश्न

कांदाच्या उत्पादनाला योग्य दर मिळत नसल्याने मागे शेतकरी आणि महा विकास आघाडीच्य नेत्यांना नाशिक जिल्ह्यात आंदोलन केले होते. वरूनही विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील, अशी चर्चा सुरु आहे. 

    • सिंहस्थ कुंभमेळा 

    राज्याची आर्थिक परिस्थिती हालाखीची असतानाही सरकारकडून मोठ्या संख्येने सिंहस्थ कुंबमेळ्याच्या पार्श्वभूमीवर खर्च केल्या जात आहे. यावर विरोधक सभागृहात आवाज उठवण्याची शक्यता आहे. 

    • पावसाळी कामे 

    पावसाळा सुरु झाला तरी अनेक मुंबईसह अनेक ठिकाणी काही कामे प्रलंबित आहेत. मुंबई पुण्यात पहिल्या पावसातच रस्त्यावर पाणी साचले होते. त्यामुळे या प्रश्नावर सभागृहात चर्चा होण्याची शक्यता आहे.