जेएनएन, मुंबई. Maharashtra Monsoon Session 2025 Date: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आज सूप वाजले. दोन्ही सभागृहांत सध्या संविधानावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर शेलक्या शब्दांत टीका करून संविधानाचे महत्त्व पटवून दिले. आता 30 जून पासून महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे होणार आहे.

अजित पवारांनी मांडला

उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजमंत्री अजित पवार यांनी वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी विधानसभेत सादर केला. राज्यात गुंतवणुकीला पोषक वातावरण असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, औद्योगिक विकासात  राज्य सदैव अग्रेसर असून थेट विदेशी गुंतवणूकीच्या बाबतीतही देशात अव्वल आहे. जानेवारी, 2025 मध्ये दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये राज्य शासनाव्दारे एकूण 63 कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. त्‍याव्दारे येत्या काळात 15 लाख 72 हजार 654 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यातून सुमारे 16 लाख रोजगार निर्मिती होईल, असा त्यांनी अर्थसंकल्प सादर करताना व्यक्त केला होता.

या विभागांना मिळाला इतका निधी 

सन 2025-26 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरीता कृषि विभागास 9 हजार 710 कोटी रुपये, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्य व्यवसाय विकास विभागास 635 कोटी रुपये, फलोत्पादन विभागास 708 कोटी रुपये, मृद व जलसंधारण विभागास 4 हजार 247 कोटी रुपये, जलसंपदा व खारभूमी विभागास 16 हजार 456 कोटी रुपये, मदत व पुनर्वसन विभागास 638 कोटी रुपये, रोहयो विभागास 2 हजार 205 कोटी रुपये,सहकार व पणन विभागास 1 हजार 178कोटी रुपये, अन्न व नागरी पुरवठा विभागास 526 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित केला आहे, असं अजित पवारांनी सांगितलं होतं.

    लाडक्या बहि‍णींची आशा फोल ठरली

    त्यावर आजपर्यंत चर्चा झाली. अनेक नेत्यांनी आपली मते व्यक्त केली. अनेक मागण्या मांडल्या, मात्र, या अधिवेशनात लाडक्या बहि‍णींच्या अनुदानाची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली.