मुंबई. Municipal councils election postponed: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने (एसईसी) पुणे जिल्ह्यातील बारामतीसह राज्यातील २२ नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. प्रमुख अपिलांवर जिल्हा न्यायालयाने आयोगाच्या निर्धारित अंतिम मुदतीपेक्षा उशिरा आदेश दिल्याने या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बाधित परिषदा आणि वॉर्डांसाठी सुधारित मतदान तारीख आता 20 डिसेंबर 2025 ही निश्चित करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुणे जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या प्रेस नोटनुसार, एसईसीने यापूर्वी असे निर्देश दिले होते की जिथे सदस्यत्व अपात्रता किंवा आरक्षण वादांशी संबंधित अपील जिल्हा न्यायालयांसमोर प्रलंबित आहेत तिथे नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
निवडणुका मूळ वेळापत्रकानुसार सुरू राहण्यासाठी, आयोगाने न्यायालयांना 22 नोव्हेंबर 2025 पर्यंत त्यांचे निर्णय देणे बंधनकारक केले होते.
तथापि, बारामती नगरपरिषद आणि फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाशी संबंधित अपीलांवर जिल्हा न्यायालयाने 26 नोव्हेंबर 2025 रोजीच निर्णय दिला, म्हणजे एसईसीच्या कटऑफ तारखेच्या चार दिवस विलंबाने. याशिवाय, दोन्ही परिषदेतील सदस्य जागांशी संबंधित आदेश देखील 22 नोव्हेंबरनंतर जारी करण्यात आले.
या विलंबांचा हवाला देऊन, एसईसीने दोन्ही परिषदांच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या जागांसाठीच्या संपूर्ण सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलण्याचा आदेश दिला. या संस्थांसाठी मतदान आता 20 डिसेंबर रोजी होईल.
पुढे, एसईसीने असे नमूद केले की तळेगाव दाभाडे, लोणावळा, दौंड आणि सासवड नगरपरिषदांमधील सदस्य जागांबद्दलच्या अपिलांमध्येही असाच विलंब झाला. या सर्व प्रकरणांमध्ये, न्यायालयीन निर्णय अंतिम तारखेनंतर देण्यात आले, ज्यामुळे आयोगाला प्रभावित वॉर्डांसाठी निवडणुका पुन्हा वेळापत्रकबद्ध करण्यास भाग पाडले गेले.
नवीन नामांकण नाही, मात्र अर्ज माघारीची मुभा-
या निवडणुकांसाठी कोणतेही नवीन नामांकन स्वीकारले जाणार नाही, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. फक्त विद्यमान नामांकन मागे घेण्याची परवानगी आहे,10 डिसेंबर 2025 (दुपारी 3:00) ही माघार घेण्याची अंतिम मुदत आहे.
राज्य निवडणूक आयोग सर्व प्रभावित परिषदांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित करेल. मतदार आणि उमेदवारांना पुरेशी माहिती मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने सांगितले की, वेळापत्रक स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रसारित केले जाईल, असे एएनआयने वृत्त दिले आहे.
कुठे-कुठे निवडणुका पुढं ढकलल्या? local body Election 2025 Postponed)
- पुणे जिल्हा - बारामती
- लातूर जिल्हा -रेणापूर
- सोलापूर जिल्हा - मंगळवेढा, अनगर
- सातारा जिल्हा - महाबळेश्वर, फलटण
- यवतमाळ नगरपालिका
- वाशिम नगरपालिका
- चंद्रपूरमधील घुग्गुस
- वर्धामधील देवळी,
- बुलढाणामधील देऊळगाव राजा
- अकोला जिल्ह्यातील बाळापूर
- हिंगोली जिल्ह्यातील वसमत,
- नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि धर्माबाद
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ
- अहिल्यानगर जिल्हा - कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी.
