जेएनएन, मुंबई. Maharashtra Day 1 May: महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त 1 मे 2025 रोजी शिवाजी पार्क मैदान येथे परेड संचलन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. परेड संचलन सुरळीत पार पाडण्यासाठी सकाळी 6 ते दुपारी 12 या वेळेत शिवाजी पार्क परिसरातील लगतचे रस्त्यांवरील वाहतूकीचे नियमन व नियंत्रण तात्पुरत्या स्वरुपात खालील प्रमाणे करण्यात येणार आहे.
अ) वाहतुकीस प्रवेश बंद व वन वे मार्ग :-
- दक्षिण केळुस्कर व उत्तर केळुस्कर मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद. (आमंत्रित वगळता)
- एस. के. बोले रोड हा सिध्दीविनायक मंदिर जंक्शनपासून पोर्तुगिज चर्च जंक्शन पर्यंत एक दिशा मार्ग राहील.
- स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग हा सिध्दीविनायक जंक्शन ते यस.बँक जंक्शन पर्यंत वाहतूकीस बंद राहील.
- सिध्दीविनायक जंक्शन येथून स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गे पश्चिम उपनगराकडे जावू इच्छिणाऱ्या वाहन चालकांनी सिध्दीविनायक जंक्शन येथे उजवे वळण घेवून, एस. के. बोले रोडने पोर्तुगिज चर्च जंक्शन येथे डावे वळण घेवून गोखले रोड मार्गे गडकरी जंक्शन, एल. जे. रोड, राजा बडे चौक येथून पश्चिम उपनगराकडे प्रस्थान करतील.
- यस बँक जंक्शन येथून सिध्दीविनायक मंदिर जंक्शन पर्यंत प्रवेश बंद केल्याने, दक्षिण मुंबईकडे जावू इच्छिणार वाहन चालक हे त्यांनी दादरचे एस. बी. एस. रोडने यस. बँक जंक्शन येथे डावे वळण घेवून पोर्तुगिज नाईक मार्ग राजा बडे चौक येथे आल्यानंतर उजवे वळण घेवून एल. जे. रोड, गडकरी जंक्शन मार्गे गोखले रोड मार्गाने दक्षिण मुंबईकडे प्रस्थान करतील.
हेही वाचा - 1 May Maharashtra Day: महाराष्ट्र दिन मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम
ब) वाहने उभी करण्यास प्रतिबंध असलेले मार्ग (नो-पार्किंग)
- केळुस्कर मार्ग दक्षिण व उत्तर.
- पांडूरंग नाईक मार्ग
- एन. सी. केळकर मार्ग, गडकरी जंक्शन पासून कोतवाल गार्डन पर्यंत.
हेही वाचा - Maharashtra Cabinet: फडणवीस सरकारचे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 11 मोठे निर्णय, वाचा सविस्तर…
क) पोलीस, पी. डब्ल्यु. डी. आणि इतर शासकीय विभागाच्या वाहनांकरीता पार्किंग व्यवस्था.
- स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक.
- वनिता समाज सभागृह.
- महात्मा गांधी जलतरण तलाव.
- कोहिनुर सार्वजनिक वाहन तळ, एन. सी. केळकर रोड, दादर (प.), मुंबई.
वाहतूक वळवलेले मार्ग
पश्चिम उपनगरांकडे जाणारी वाहतूक: सिद्धिविनायक जंक्शनवरून एसके बोले रोड, पोर्तुगीज चर्च, गोखले रोड, एलजे रोड आणि राजा बडे चौक मार्गे वळवली जाईल.
दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूक: पांडुरंग नाईक रोड, राजा बडे चौक, एलजे रोड आणि गोखले रोड मार्गे वळवली जाईल.
दि. ०१/०५/२०२५ रोजी महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त होणाऱ्या संचलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत काही बदल करण्यात आले आहेत.
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) April 26, 2025
शिवाजी पार्क मैदानाच्या परिसरातील सर्व रस्त्यांवर दि.०१/०५/२०२५ रोजी सकाळी ६.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत खालील वाहतूक व्यवस्था कायम राहील. pic.twitter.com/EURQDXVmZ9