जेएनएन, मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज राज्य मंत्रिमंडळाची मुंबईत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत महत्त्वाचे 4 निर्णय (Maharashtra Cabinet decision) घेण्यात आले आहेत.
नागपूर येथे लता मंगशेकर विद्यापीठ स्थापन होणार. तसेच अहिल्यानगर येथे डॉ. बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठ, या विद्यापीठांच्या स्थापनेला सरकारने मंजुरी दिली आहे. यासह आज झालेल्या बैठकीत इतर विविध विभागाच्या निणर्यांचा समावेश आहे.
सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थित होते.
मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)
- आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या राज्यातील खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना दिल्या जाणाऱ्या रोख बक्षिस धोरणात सुधारणा ( क्रीडा विभाग)
- नागपूर येथे लता मंगशेकर विद्यापीठ स्थापन होणार. तसेच अहिल्यानगर येथे डॉ. बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठ, या खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठात वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, फिजिओथेरपी आणि नर्सिंग विद्याशाखांमधील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशॅलिटी अभ्यासक्रम सुरु होणार. (उच्च व तंत्रशिक्षण विभाग)
- जत नगरपरिषदेला प्रशासकीय इमारत उभारणीसाठी मौजे जत (जि. सांगली) येथील 2 हजार 585 चौ. मीटर शासकीय जमीन देण्यास मान्यता ( महसूल व वन विभाग)
- नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय होणार. त्यासाठीची पदे व अनुषांगिक खर्चाच्या तरतुदीस मान्यता. (विधि व न्याय)
