मुंबई. Maharashtra Cabinet meeting Decision: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (1 सप्टेंबर) राज्य मंत्रिमंडळ बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व जवळपास सर्व खात्याचे मंत्री उपस्थित होते. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही कारणास्तव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत एकूण चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. याच बैठकीत पुणे जिल्ह्यातील कुकडे पाटबंधारा प्रकल्पाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून शेकडो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. गृह विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभआगा या विभागाअंतर्गतही काही निर्णय घेण्यात आले आहेत.
तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे चर्चेत आलेली उपहारगृहे, हॉटेल व रेस्टॉरंटबाबतही महत्वाचा निर्णय घेण्यात आला.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतलेले 4 महत्वाचे निर्णय-
- नशामुक्त भारत अभियानात महाराष्ट्राचे पुढचे पाऊल. सन 2029 पर्यंत महाराष्ट्रातून अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करणार. त्यासाठी राज्य शासनाचे सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोन (A Whole-of Government Approach) धोरण जाहीर. (गृह विभाग)
- शासकीय-निमशासकीय बैठका, कार्यक्रमांच्या दरम्यान तसेच उपहारगृहात आरोग्यदायी अन्नपदार्थ ठेवण्याच्या धोरणाला मान्यता. संतुलित मेन्यू ठेवणे बंधकारक (सार्वजनिक आरोग्य विभाग)
- सोलापूर शहरातील जुना पुणे नाका ते बोरामणी नाका दरम्यान उन्नत मार्ग प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून घोषित. यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वरील हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक शासकीय जमीन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणास (NHAI) हस्तांतरित होण्याचा मार्ग मोकळा. (सार्वजनिक बांधकाम विभाग)
- कुकडी पाटबंधारे प्रकल्प, जिल्हा पुणेला 5704.50 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मान्यता; 1,44,912 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार (जलसंपदा विभाग)
