जेएनएन, मुंबई. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे अर्धसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात शोकप्रस्ताव मांडला. या शोकप्रस्ताववर बोलताना रोहित पवारांना (Rohit Pawar) अश्रू अनावर झाले.
अजित पवारांच्या आठवणींनी रोहित पवारांना अश्रू अनावर
अजित पवारांबद्दल बोलताना आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देताना रोहित पवारांना अश्रू अनावर झाले. यावेळी बोलताना सभागृहात त्यांनी चौकशी काय होईल माहिती नाही. पण आम्ही या अपघातासाठी जो कोणी जबाबदार आहे, त्याला सोडणार नाही. मग तो केणी काय असेना, असं रोहित पवार म्हणाले.
अजित काका नेहमी मला म्हणायचे की केस वाढलेत केस कमी करं, ते मला नेहमी म्हणायचे शारीरिक वजन कमी आणि राजकीय वजन वाढलं. मी काकांना आज शब्द देतो की मी शारीरिक वजन कमी करेल आणि राजकीय वजन नक्कीच वाढवेल. जेव्हा केव्हा 50-60 वर्षांनी मी काकांना भेटेल त्यावेळेस त्यांच्या हाताने शर्टाचे बटन लावेल, असं ते म्हणाले.
📍विधान भवन, मुंबई ⏭️23-02-2026 अर्थसंकल्पीय अधिवेशन -2026 |रोहित पवार विधानसभेतून लाईव्ह https://t.co/jDbM1iQwBW
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 23, 2026
