जेएनएन, नवी मुंबई. Maharashtra Assembly Elections 2024: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागावाटप वरुन वाद सुरू झाला आहे. जागावाटप सुरू असतानाच मविआचे मित्र पक्ष शेतकरी कामगार पक्षाने उरण विधानसभा मतदार संघातून उमेदवार जाहीर केला आहे. उरण विधानसभा मतदार संघातून पनवेलचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या अडचणीत वाढ झाली आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार मनोहर भोईर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. उरण विधानसभा मतदार संघावर ठाकरे गटाने दावा केला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या दाव्यानंतर ही शेकपाने आपला उमेदवार घोषित केला आहे. शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांनी कार्यकर्ता मेळावा घेऊन कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहे. म्हात्रे कडून अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांना शेकप पक्षात प्रवेश दिले आहेत. शेकपने उरण विधानसभा मतदार संघात उमेदवार दिल्याने मविआत नाराजी नाट्य सुरू झाले आहे. मविआमध्ये अजूनही जागा वाटपचे समीकरण ठरले नाही. येत्या दोन ते तीन दिवसात मविआमध्ये जागावाटपाच निर्णय होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
By: Vinod RathodEdited By: Ankur BorkarPublish Date: Mon 07 Oct 2024 09:49:01 AM (IST)Updated Date: Mon 07 Oct 2024 01:42:43 PM (IST)
