महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! 15 विशेष गाड्या धावणार; नागपूर-मुंबई मार्गावर आठ फेऱ्या
Mahaparinirvan Din: मध्य रेल्वेकडून 4 ते 8 डिसेंबर 2026 या कालावधीत एकूण 15 अनारक्षित विशेष रेल्वे सेवा चालविण्यात येणार आहेत. यामध्ये नागपूर-मुंबई मार्गावर सर्वाधिक आठ विशेष सेवा नियोजित करण्यात आल्या आहेत.
By: Vinod RathodEdited By: Dnyaneshwar MathePublish Date: Wed 25 Nov 2026 09:04 AM (IST)Updated Date: Wed 25 Nov 2026 09:04 AM (IST)
Indian Railway - प्रतिकात्मक फोटो
जेएनएन, नागपूर/मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर रोजी असलेल्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी मुंबईत दाखल होतात. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष नियोजन केले आहे.
मध्य रेल्वेकडून 4 ते 8 डिसेंबर 2026 या कालावधीत एकूण 15 अनारक्षित विशेष रेल्वे सेवा चालविण्यात येणार आहेत. यामध्ये नागपूर-मुंबई मार्गावर सर्वाधिक आठ विशेष सेवा नियोजित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील अनुयायांना मुंबईला येणे आणि अभिवादनानंतर परत जाणे अधिक सोयीचे होणार आहे.
दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादनासाठी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून अनुयायी येतात. नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा आदी विदर्भातील जिल्ह्यांतूनही मोठ्या संख्येने अनुयायी मुंबईत येतात. नियमित रेल्वेगाड्यांमधील गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था केली आहे. या विशेष गाड्या नागपूर, अमरावती, कोल्हापूर आणि कलबुर्गी येथून मुंबईला येण्यासाठी तसेच परतीच्या प्रवासासाठी उपलब्ध असणार आहे.
नागपूर-मुंबई मार्गावर आठ विशेष गाड्या
नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान चार विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. तर मुंबईहून नागपूरसाठी चार विशेष गाड्या धावणार आहे.
नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या :
गाडी क्रमांक
सुटण्याची तारीख व वेळ
मुंबईत आगमन
01260
4 डिसेंबर, सायंकाळी 6.10
5 डिसेंबर, सकाळी 10.55
01262
4 डिसेंबर, रात्री 11.55
5 डिसेंबर, सायंकाळी 4.15
01264
5 डिसेंबर, सकाळी 7.40
5 डिसेंबर, रात्री 11.55
01266
5 डिसेंबर, सायंकाळी 6.10
6 डिसेंबर, सकाळी 10.55
मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या गाड्या :
गाडी क्रमांक
सुटण्याची तारीख व वेळ
नागपूरमध्ये आगमन
01249
6 डिसेंबर, रात्री 8.25
7 डिसेंबर, सकाळी 11.20
01251
7 डिसेंबर, सकाळी 10.30
8 डिसेंबर, मध्यरात्री 12.55
01255
7 डिसेंबर, दुपारी 12.35
8 डिसेंबर, पहाटे 3.00
01257
8 डिसेंबर, मध्यरात्री 12.25
8 डिसेंबर, सायंकाळी 4.10
याशिवाय दादर ते नागपूरदरम्यान एक स्वतंत्र विशेष गाडी चालविण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 01253 ही 7 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12.40 वाजता दादरहून सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 4.10 वाजता नागपूरला पोहोचेल.
विदर्भातील प्रमुख स्थानकांवर थांबे
नागपूर-मुंबई विशेष गाड्यांना विदर्भातील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. यामध्ये अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, नांदुरा आणि मलकापूर या स्थानकांचा समावेश आहे.
त्यानंतर भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर येथेही या गाड्या थांबतील. त्यामुळे विदर्भातून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांना आपल्या जवळच्या स्थानकावरून प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
अमरावती, कोल्हापूर, कलबुर्गीसाठीही विशेष सेवा
नागपूर-मुंबई मार्गाव्यतिरिक्त अमरावती, कोल्हापूर आणि कलबुर्गी येथूनही विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.
अमरावती-मुंबई : गाडी क्रमांक 01218 ही 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.45 वाजता अमरावतीहून सुटून 6 डिसेंबर रोजी पहाटे 5.25 वाजता सीएसएमटीला पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक 01217 ही 7 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12.40 वाजता मुंबईहून सुटेल.
कोल्हापूर-मुंबई : गाडी क्रमांक 01402 ही 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 4.40 वाजता कोल्हापूरहून सुटेल. परतीची गाडी क्रमांक 01401 ही 6 डिसेंबर रोजी रात्री 10.30 वाजता सीएसएमटीहून रवाना होईल.
कलबुर्गी-मुंबई : गाडी क्रमांक 01245 ही 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता कलबुर्गीहून सुटेल. परतीची गाडी क्रमांक 01246 ही 7 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12.25 वाजता सीएसएमटीहून सुटेल.
या गाड्यांना मार्गावरील प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
आरक्षणाची गरज नाही; यूटीएसवरून तिकीट उपलब्ध
मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या या सर्व विशेष सेवा अनारक्षित स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना आगाऊ आरक्षण करण्याची आवश्यकता नाही. सामान्य द्वितीय श्रेणीच्या दराने यूटीएस प्रणालीद्वारे तिकीट काढून प्रवास करता येणार आहे.
This website uses cookies or similar technologies to enhance your browsing experience and provide personalized recommendations. By continuing to use our website, you agree to our Privacy Policy and Cookie Policy.