मुंबई - Mahaparinirvan Diwas 2025 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन 2025 निमित्त प्रवाशांच्या  सोयीसाठी मध्य रेल्वेकडून अतिरिक्त लोकल ट्रेन फेऱ्याची घोषणा करण्यात आली आहे. 5 आणि 6 डिसेंबर (शुक्रवार – शनिवार)च्या मध्यरात्री परळ– कल्याण आणि कुर्ला – वाशी/पनवेल दरम्यान मध्य रेल्वेकडून 12 विशेष लोकल गाड्या सोडल्या जाणार आहेत. या विशेष लोकल गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत येणाऱ्या अनुयायांच्या सुविधेसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने तयारी पूर्ण केली आहे. मुंबई बाहेरील प्रवाशांना चैत्यभूमी आणि राजगृह येथे पोहोचण्यासाठी दादर, सीएसएमटीवरून 15 विशेष मेल, एक्स्प्रेसची घोषणाही करण्यात आली आहे. 

विशेष लोकल ट्रेन या मार्गावर धावेल -

मध्ये रेल्वे मार्ग – अप विशेष गाड्या (कल्याण/ठाणे/कुर्ला– परळ मार्ग)

मध्ये रेल्वे मार्ग – डाउन विशेष गाड्या (परळ - कुर्ला/ठाणे/कल्याण मार्ग)

हार्बर मार्ग – अप विशेष गाड्या (पनवेल/वाशी – कुर्ला मार्ग)

    हार्बर मार्ग – डाउन विशेष गाड्या (कुर्ला– वाशी/पनवेल मार्ग)

    मेगाब्लॉक रद्द -

    6 डिसेंबर रोजी (रविवार) सामान्य वेळापत्रकाप्रमाणे लोकल चालवण्यात येणार आहेत. रविवारी असणारा रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. अनुयायांच्या गर्दीला मार्गदर्शन आणि सूचना देण्यासाठी 135 टीसींची नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकातील रेल्वे फलाट, पादचारी पूल, प्रवेशद्वार या ठिकाणी रेल्वे पोलिस आणि आरपीएफ यांचे ७०० अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 

    12 विशेष लोकल चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. शुक्रवार, 5 डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर परळ ते कल्याण आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी पनवेलदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.

    मध्य रेल्वे

    मुख्य मार्ग (अप)

    कुर्ला - परळ - रात्री 11.45

    कल्याण - परळ - मध्यरात्री 1.00

    ठाणे - परळ - मध्यरात्री 2.10

    मुख्य मार्ग (डाउन)

    परळ - ठाणे - मध्यरात्री 1.15

    परळ - कल्याण - मध्यरात्रीनंतर 2.30

    परळ - कुर्ला - मध्यरात्री 3.05

    हार्बर मार्ग (अप)

    वाशी - कुर्ला - मध्यरात्री 1.30

    पनवेल - कुर्ला - मध्यरात्री 1.40

    वाशी - कुर्ला - मध्यरात्री 3.10

    हार्बर मार्ग (डाउन)

    कुर्ला - वाशी - मध्यरात्री 2.30

    कुर्ला - पनवेल - मध्यरात्री 3.00

    कुर्ला - वाशी - पहाटे 4.00