मुंबई (पीटीआय) महापरिनिर्वाण दिवसापूर्वी गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पुढील तीन दिवस 13 प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री प्रतिबंधित करण्यात आली आहे, असे मध्य रेल्वेने गुरुवारी सांगितले.

हा निर्णय 5 ते 7 डिसेंबरपर्यंत लागू राहील, असे एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

दरवर्षी, महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक दादरमधील चैत्यभूमीवर जमतात, जिथे डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्यावर अंतिम संस्कार झाले होते. त्या ठिकाणी 6 डिसेंबर रोजी संविधानाचे मुख्य शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी अनुयायी दोन दिवस आधीपासूनच मुंबईत येण्यास सुरूवात करतात.

रेल्वे विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, वृद्ध, ज्येष्ठ नागरिक, आजारी, मुले, निरक्षर आणि महिला प्रवाशांना सोबत घेऊन जाणारे लोक प्लॅटफॉर्म तिकिटे खरेदी करू शकतील.

मुंबईत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादर या गर्दीच्या स्थानकांवरही प्लॅटफॉर्म तिकिट विक्रीवरील निर्बंध लागू असतील.

खालील स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटे मिळणार नाहीत -

    भुसावळ, नाशिकरोड, मनमाड, जळगाव, अकोला, शेगाव, पाचोरा, बडनेरा, मलकापूर, चाळीसगाव आणि नागपूर येथेही प्लॅटफॉर्म तिकीट विक्री प्रतिबंधित करण्यात आली आहे.