जेएनएन, मुंबई: राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषदाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समित्या सभापती व उपसभापती यांसाठी पदांचे आरक्षण व निवडणूक नियम 1962 अंतर्गत आरक्षणाचा जाहीर करण्यात आला आहे. 

9 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या या आदेशानुसार, राज्यातील एकूण 34 जिल्हा परिषदा अध्यक्षपदांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागास प्रवर्ग (OBC), महिला व सर्वसाधारण प्रवर्ग अशा विविध वर्गवारीतून आरक्षण ठरविण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण मर्यादेत ठेवून हा आरक्षण तयार केला आहे.

जाहीर यादीनुसार, ठाणे, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ यांसह नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांसाठी सर्वसाधारण प्रवर्ग खुला ठेवण्यात आला आहे. यामध्ये ठाणे, सांगली, कोल्हापूर, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली यांसारख्या जिल्ह्यांत सर्वसाधारण (महिला) आरक्षण लागू करण्यात आले आहे.

अनुसूचित जातीसाठी बीड (महिला), हिंगोली, परभणी, वर्धा आणि चंद्रपूर (महिला) ही पदे आरक्षित करण्यात आली आहेत. तर अनुसूचित जमातीसाठी पालघर, नंदुरबार, अहिल्यानगर (महिला), अकोला (महिला) आणि वाशिम (महिला) या जिल्ह्यांतील अध्यक्षपदे राखीव ठेवली गेली आहेत.

नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) साठी रत्नागिरी (महिला), धुळे (महिला), सातारा (महिला), सोलापूर, जालना (महिला), नांदेड, धाराशिव (महिला), नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.

    एकूण लोकसंख्येच्या प्रमाणावर अनुसूचित जाती-जमाती व ओबीसी प्रवर्गाला आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. महिलांसाठी (SC, ST, OBC व सर्वसाधारण) स्वतंत्र आरक्षण कोटा निश्चित करण्यात आला आहे. हे आरक्षण एकदाच वापरायचे असून पुढील निवडणुकांमध्ये फेरबदल होणार आहे.

    जिल्हा परिषदा आणि अध्यक्षपदाचे आरक्षण

    अ.क्र.जिल्हा परिषदेचे नावजिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाचा प्रवर्ग
    1ठाणेसर्वसाधारण (महिला)
    2पालघरअनुसूचित जमाती
    3रायगडसर्वसाधारण
    4रत्नागिरीनागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
    5सिंधुदुर्गसर्वसाधारण
    6नाशिकसर्वसाधारण
    7धुळेनागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
    8नंदूरबारअनुसूचित जमाती
    9जळगावसर्वसाधारण
    10अहमदनगरअनुसूचित जमाती (महिला)
    11पुणेसर्वसाधारण
    12सातारानागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
    13सांगलीसर्वसाधारण (महिला)
    13सोलापूरनागरिकांचा मागास प्रवर्ग
    15कोल्हापूरसर्वसाधारण (महिला)
    16छत्रपती संभाजीनगरसर्वसाधारण
    17जालनानागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
    18बीडअनुसूचित जाती (महिला)
    19परभणीअनुसूचित जाती
    20हिंगोलीनागरिकांचा मागास प्रवर्ग
    21नांदेडनागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
    22धाराशिवसर्वसाधारण (महिला)
    23लातूरसर्वसाधारण (महिला)
    24अमरावतीसर्वसाधारण (महिला)
    25अकोलाअनुसूचित जमाती (महिला)
    26वाशिमअनुसूचित जमाती (महिला)
    27बुलढाणासर्वसाधारण
    28यवतमाळसर्वसाधारण
    29नागपूरनागरिकांचा मागास प्रवर्ग
    30वर्धाअनुसूचित जाती
    31भंडारानागरिकांचा मागास प्रवर्ग
    32गोंदियासर्वसाधारण (महिला)
    33चंद्रपूरअनुसूचित जाती (महिला)
    34गडचिरोलीसर्वसाधारण (महिला)