Maharashtra Breaking News: राज्यात मान्सून दाखल झाला आहे. काल दिवसभर मुंबईसह राज्याला मुसळधार पावसानं झोडपून काढल आहे. आजही राज्यात अनेक भागात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. याकडे आपले मराठी जागरणचं लक्ष असेल.
मुंबईत काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईची वातहुक मंदावली आहे. अनेक लोकल ट्रेनही धिम्मा गतीनं सुरु आहेत. अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचले होते. यातच येत्या 24 तासांत या भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले होते. मुंबई होणाऱ्या पावसाचा आणि इतर घडामोंडीवर मराठी जागरणच लक्ष असेल…
वैष्णवी हवगणे प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन सोडला आहे. या प्रकरणातील पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढे या प्रकरणात काय घडामोडी घडतात, पोलिस काय कारवाई करतात, यावर मराठी जागरणचं लक्ष असेल…
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते दौऱ्यात विविध ठिकाणी सभा घेणार आहेत. याकडे मराठी जागरणचं लक्ष असेल… एकूण राज्यात घडत असलेल्या राजकीय आणि सामाजिक घटना आणि घडामोडींचा आढावा या लाईव्ह अपडेटच्या माध्यमातून घेणार आहेत….
- 2025-05-27 17:06:22
Shirdi News: शिर्डीत 3,500 किलो केसर आंबे रस
शिर्डीच्या साईबाबा संस्थानला एका भक्ताने 3,500 किलो केसर आंबे दान केले आहेत. या अर्पणाचा एक भाग म्हणून, प्रसादालयात भाविकांना आंब्याचा रस प्रसाद म्हणून दिला जात आहे.https://twitter.com/PTI_News/status/1927315406059884731
- 2025-05-27 15:37:26
Mumbai Rains: मुंबई झाड अंगावर कोसळल्यानं एकाचा मृत्यू
गेल्या 24 तासांत महानगरात झालेल्या पावसामुळे मुंबईत झाड कोसळण्याच्या किंवा झाडांचया फांद्या कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. यात एका 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे तर एक जखमी झाला, असे महापालिकेने सांगितले. - 2025-05-27 15:26:41
नुकसानग्रस्तांना एकरी 20 हजार रुपये मदत तातडीने द्यावी - काँग्रेस
राज्यातील शेतकरी संकटाचा सामना करत असतानाच मुसळधार पावसाने पुन्हा त्याला संकटात टाकले आहे. या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पिकही वाहून गेले आहे. निसर्ग लहरी झाला असून राज्यातील फडणविसांचे सुलतानी सरकार शेतकरी व जनतेच्या मुळावर उठले आहे. संकटातील शेतकऱ्याला मदतीची गरज असून सरकारने पंचनाम्याचे सरकारी सोपस्कर बाजूला ठेवून नुकसानग्रस्तांना एकरी 20 हजार रुपये मदत तातडीने द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. - 2025-05-27 15:23:01
Palghar News: पालघरमध्ये अवकाळी पावसामुळे 9,000 हून अधिक शेतकरी प्रभावीत
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील 9,000 हून अधिक शेतकरी आणि मच्छीमार प्रभावित झाले आहेत आणि प्रशासनाने नुकसानीचे मूल्यांकन केले आहे, असे एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले - 2025-05-27 14:54:59
विदर्भात पुढील 24 तासात मुसळधार पाऊस
विदर्भात पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज ! विदर्भातील यवतमाळ,चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा नागपूर जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.पुढील 24 तासात मुसळधार अवकाळी पावसाचा इशारा आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस विदर्भात पावसाचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिला. - 2025-05-27 13:43:42
Monsoon 2025: शेतकऱ्यांनी आत्ताच पेरणीची घाई करु नये
छत्रपती संभाजीनगर शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. आत्ताच पेरणीची घाई करु नये असे जिल्हाधिकारी आवाहन दिलीप स्वामी यांनी शेतकऱ्यांना केले आहे.https://twitter.com/InfoCSNagar/status/1927256970437746749
- 2025-05-27 13:23:50
Thane News: ठाण्यात वीज कोसळून महिलेचा मृत्यू
ठाणे जिल्ह्यातील एका गावात वीज कोसळून एका 51 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. सोमवारी दुपारी शाहपूरमधील चतु बुद्रुक गावात ही घटना घडली, असे तहसीलदार परमेश्वर कासुले यांनी सांगितले. सुनंदा पडवळ असं महिलेचं नाव आहे. - 2025-05-27 13:10:47
Red Alert in Pune: पुण्यात रेड अलर्ट, पुढील 3-4 तासांत...
महाराष्ट्रातील जिल्हानिहाय पुढील 3-4 तासांसाठी हवामान इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट तर धुळे, नंदुरबार ला येलो अलर्ट देण्यात आला आहेत. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.https://twitter.com/InfoDhule/status/1927259506494361849
- 2025-05-27 12:35:00
Mumbai Rains Update: मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
मुंबईतील काही भागात हलका पाऊस पडल्याने हवामान आल्हाददायक झाले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार शहरात ढगाळ आकाश आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.https://twitter.com/ANI/status/1927181786532000244
- 2025-05-27 12:17:49
Raigad News : पुढील 3-4 तासांत रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार
हवामान माहिती - 27/05/2025 रोजी सकाळी साडेदहा वाजता जारी केलेला इशारा: पुढील 3-4 तासांत रायगड जिल्ह्यांतील काही ठिकाणी 30-40 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह वादळे आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बाहेर पडताना खबरदारी घ्या. असं आवाहन IMD मुंबईने केले आहे. - 2025-05-27 11:59:46
Mumbai Rains- मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता
BMC on Mumbai Rains: मुंबई शहर आणि उपनगरात वातावरण ढगाळ राहील. काही ठिकाणी तुरळक स्वरुपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, असं बीएमसीनं सांगितलं आहे.https://twitter.com/mybmc/status/1927224760095707165
- 2025-05-27 11:49:01
Kolhapur Rain News: कोल्हापुरात 13 बंधारे पाण्याखाली
Kolhapur Latest News: आज सकाळी 6 वाजता पर्यंत कोल्हापुरात 13 बंधारे पाण्याखाली गेले आहेत, अशी माहिती कोल्हापुर जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पाण्याखालील बंधारे 13 पाणी पातळी राजाराम - 19 फूट 8 इंच (इशारा 39 फूट, धोका 43 फूट) रुई - 44 फूट 11 इंच (इशारा 67 फूट, धोका 70 फूट) इचलकरंजी - 38 फूट 7 इंच (इशारा 68 फूट, धोका 71 फूट) तेरावाड- 37 फूट 3 इंच (इशारा 71 फूट, धोका 73 फूट) ….https://twitter.com/Info_Kolhapur/status/1927194570082722074
- 2025-05-27 11:34:04
Pune Rains: पुण्यात पुढीत 3 तासांत मुसळधार पाऊस
Pune Rains Latest Update: आज 27 मे 2025 रोजी पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला असून जिल्ह्यात पुढील 3 तासात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असं जिल्हा प्रशासनाने आवाहन केलं आहे.https://twitter.com/Info_Pune/status/1927212215062376563
- 2025-05-27 11:27:03
Raigad Rains: रायगड जिल्ह्यातील मुख्य नद्यांची पाणी पातळी
रायगड जिल्ह्यातील मुख्य नद्यांची पाणी पातळी व पाऊस याबाबतची माहिती - 2025-05-27 11:20:28
Thane News: ठाण्यात इमारत कोसळली
ठाणे शहरात मंगळवारी पहाटे नागरी अधिकाऱ्यांनी धोकादायक म्हणून वर्गीकृत केलेल्या जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. वागळे इस्टेट परिसरातील नंदादीप इमारतीत पहाटे 2.25 वाजता घडलेल्या घटनेनंतर 17 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आणि सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले. सविस्तर वाचा - Thane Building Collapse: ठाण्यात जीर्ण इमारत कोसळली; 17 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवले - 2025-05-27 11:04:40
मुसळधार पावसात पुलाखाली पाण्यात अडकली बस
सोलापुरात मुसळधार पाऊस झाला आहे. तसंच, बार्शी तालुका आणि शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बार्शी-तुळजापूर रस्त्यावरील अशोका गार्डनजवळील रेल्वे ब्रिजखाली साचलेल्या पाण्यात एक बस अडकली होती. ज्यामध्ये 27 प्रवासी अडकून पडले होते. सविस्तर वाचा नेमका काय घडला थरार -Solapur News: मुसळधार पावसात पुलाखाली पाण्यात अडकली बस, 27 प्रवाशांना अन् भयावह थरार... - 2025-05-27 10:50:12
Mumbai Rains LIVE Updates: खारच्या काही भागात पाणी साचले
मुंबईत मुसळधार पावसामुळे खारच्या काही भागात पाणी साचले आहे. नॅशनल कॉलेजजवळील स्वामी विवेकानंद रोड परिसरात पाणी साचल्याचे व्हिडिओत दिसत आहे. - 2025-05-27 10:34:20
Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुढील 24 तासांत शहर आणि उपनगरात ढगाळ आकाश आणि मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. - 2025-05-27 10:32:18
Aqua Line Metro: आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशन बंद
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आलं आहे. मंगळवारी सकाळी 8 वाजता मागील 24 तासांत, मुंबईत सरासरी 106 मिमी पाऊस पडला, तर पश्चिम उपनगरात 72 मिमी आणि पूर्व उपनगरात 63 मिमी पाऊस पडला, असे बीएमसीने म्हटले आहे.https://twitter.com/PTI_News/status/1927227430219006011
- 2025-05-27 10:09:45
Mumbai Rains: मे महिन्यात पावसाने तोडला 107 वर्षांचा विक्रम!
राज्यात नैऋत्य मान्सूनने वेळेआधीच दाखल होऊन विध्वंस घडवला आहे. मुंबईसह अनेक (Mumbai Rain Update) भागांमध्ये जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईत मे महिन्यात 107 वर्षांचा विक्रम मोडणारा पाऊस झाला. बारामतीमध्ये कालव्याचा बंधारा तुटल्याने पाणी साचले आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. जोरदार पावसामुळे कांद्याच्या पिकाचे नुकसान झाले आहे. हे सुद्धा वाचा: मुंबई तुंबली! मे महिन्यात पावसाने तोडला 107 वर्षांचा विक्रम, कांदा पिकावर संकट! - 2025-05-27 08:40:48
Red Alert in Maharashtra : राज्यात या भागांना आज रेड अलर्ट
रत्नागिरी, सिंद्धुदुर्ग, कोल्हापूर घाट, कोल्हापूर, सातारा घाट या भागात आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. - 2025-05-27 08:05:41
Mumbai Rain Update: मुसळधार पावसामुळे नवी मुंबईत पाणी साचले
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. नवी मुंबईतही जोरदार पाऊस झाला असून, मुसळधार पावसामुळे नवी मुंबईत पाणी साचले.https://twitter.com/ians_india/status/1927057094072533276
- 2025-05-27 07:40:00
Rain Alert in Maharashtra : या भागात ऑरेंज अलर्ट
रायगड, पुणे घाट, सातारा, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. - 2025-05-27 07:20:42
Yellow Alert in Maharashtra: राज्यात या जिल्ह्यांना येलो अलर्ट
ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर,गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. - 2025-05-27 07:00:00
Maharashtra News: भाजपाच्या दिग्गज नेत्याचा अपघातात मृत्यू
भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा भीषण अपघात झाला आहे. लातूर -औसा रोडवर बेलकुंड गावाजवळ त्यांची कार उलटली. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक गंभीर जखमी आहे. हा अपघात काल दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान झाल्याची माहिती आहे. देशमुख हे माजलगाव मतदारसंघात 2014 ते 2019 साली आमदार होते. - 2025-05-27 06:44:42
Mumbai Rains: मुंबईत पाऊस सुरु
मुंबईच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे परिसरात पाऊस सुरु आहे.https://twitter.com/PTI_News/status/1927068036915167532