जेएनएन, मुंबई. Lalbaugcha Raja 2026 Muhurat, मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा गणपती मंडळाचा मुहूर्त पूजन सोहळा पार पडला आहे. हा सोहळा दरवर्षी गणेशोत्सवाच्या तयारीची सुरुवात मानला जातो. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष 93 वे गणेश मुहूर्त पूजन पार पडले.

गणेशोत्सवाच्या उत्साहाला प्रारंभ
यामध्ये मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक उपस्थित राहून गणपती बाप्पाच्या आगमनासाठी विधीवत पूजा केली जाते. यानंतर मूर्तीची घडण, मंडप उभारणी आणि इतर तयारीला अधिकृत सुरुवात होते. यंदाही पारंपरिक पद्धतीने पूजा करून गणेशोत्सवाच्या उत्साहाला प्रारंभ झाला आहे.

लालबागचा राजाचा गणेशोत्सव सोहळा 2026
यावर्षी लालबागचा राजाचा गणेशोत्सव सोहळा गणेशचतुर्थी , सोमवार दिनांक 14 सप्टेंबर 2026 ते अनंतचतुर्दशी, शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत साजरा होणार आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लालबागच्या राजाचे “श्री गणेश मुहूर्त पूजन” मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते पहाटे ठीक 5 वाजता संपन्न झाला.
सदर प्रसंगी मंडळाचे खजिनदार मंगेश दत्ताराम दळवी यांच्या शुभहस्ते लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पावती पुस्तकांचेही पूजन झाले.

