जेएनएन, मुंबई. Ladki Bahin Yojana: विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी वरदान ठरलेली लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Scheme) ही सध्या विविध कारणाने चर्चेत आहे. यातच आता राज्य सरकारने लाडकी बहिण योजनेमध्ये काही नवीन निकष जोडले (Ladki Bahin Yojana New Criteria) आहेत. त्यामुळे अनेक महिला अपात्र होणार असल्याची भीती व्यक्त केली आहे.
हेही वाचा - Delhi CM Oath Ceremony: रेखा गुप्ता दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री, 6 मंत्र्यांचाही झाला शपथविधी
लाडकी बहिण योजनेचे नवीन निकष (Ladki Bahin Scheme New Criteria)
- लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-केवायसी करून हयातीत असल्याचा दाखलाही जोडावा लागणार आहे.
- दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी करणे अनिवार्य असणार आहे
- ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही योजनेतून बाद केले जाईल.
- अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असल्यास महिलांना अपात्र घोषित केले जाईल.
- लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेणार आहे.
- नव्याने पात्र लाभार्थी महिलांना जुलैपासून लाभ मिळणार नाही.
- अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ मिळणार आहे.
- अर्जातील नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यामध्ये तफावत आढळल्यास अपात्र केले जाईल.
- नमो योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना 1500 रुपये दिले जाणार नाही.
हेही वाचा - iPhone 16e किंवा iPhone 15 खरेदी करताय, त्याआधी ही बातमी वाचा… तुम्हाला होईल खूप फायदा!