जेएनएन, नवी दिल्ली: रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली (Rekha Gupta take oath as new delhi cm)  आहे. यावेळी मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित होते. यासह  प्रवेश वर्मा, आशिष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, रविंदर इंद्रराज, कपिल मिश्रा आणि पंकज कुमार सिंग यांनी मंत्रीपदाची शपथ (Delhi New ministers) घेतली आहे.

चौथ्या महिला मुख्यमंत्री

भाजपच्या पहिल्यांदाच आमदार असलेल्या रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी त्यांना शपथ दिली. यासह, भाजपच्या सुषमा स्वराज, काँग्रेसच्या शीला दीक्षित आणि आपच्या आतिशी यांच्यानंतर रेखा गुप्ता ह्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत.

यांनी घेतली मंत्री पदाची शपथ

  • नवी दिल्लीचे आमदार परवेश वर्मा,
  • जनकपुरीचे आमदार आशिष सूद, 
  • राजौरी गार्डनचे आमदार मनजिंदर सिंग सिरसा, 
  • बवानाचे आमदार रविंदर इंदेराज, 
  • करावल नगरचे आमदार कपिल मिश्रा 
  • विकासपुरीचे आमदार डॉ. पंकज कुमार सिंह यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

प्रवेश वर्मा यांनी यांनी घेतली शपथ

भाजपचे प्रवेश वर्मा यांनी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली.

    जनकपुरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजप आमदार आशिष सूद यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

    दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये भाजपचे मनजिंदर सिंग सिरसा यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

    दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये भाजपचे रवींद्र इंद्रराज सिंह यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली.

    दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये भाजपचे कपिल मिश्रा यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

    दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये भाजपचे पंकज कुमार सिंह यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली.