जेएनएन, मुंबई. सप्टेंबर महिन्याच्या हफ्ता लाडक्या बहिणींच्या (Ladki Bahin Yojana) खात्यात जमा होत आहे. शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. काल याबाबतचा जीआरही जाहीर करण्यात आला आहे. जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर काय करावे, याबद्दल जाणून घेऊया…

बँक खाते पडताळणी

अर्ज प्रक्रियेदरम्यान दिलेली बँक खाते माहिती योग्य आहे आणि खाते सक्रिय आहे, याची खात्री करा. खाते क्रमांक किंवा IFSC कोडमध्ये चुकीमुळे पैसे जमा होण्यास विलंब होऊ शकतो.

हेल्पलाईनवर करा संपर्क

योजनेच्या हेल्पलाईन टोल फ्री संपर्क क्रमांक 181 वर संपर्क साधा. हेल्पलाईन कर्मचारी तुमच्या अर्जाची स्थिती तपासून पुढील काय करायचे याबाबत मार्गदर्शन करतील.

सूचनांवर लक्ष ठेवा

    स्थानिक बातम्या किंवा राज्य सरकारच्या सूचनांवर लक्ष ठेवा, कारण ते योजनेबद्दल अधिक माहिती देऊ शकतात, विशेषत: प्रलंबित रक्कम कधी आणि कशी जमा केली जाईल याबद्दल.

    स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधा

    तुमच्या परिसरातील महिला व बालविकास (WCD) कार्यालयाशी किंवा योजनेचे नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. ते तुमच्या अर्जाची स्थितीबद्दल माहिती देऊ शकतात.

    अधिकृत वेबसाइटला भेट द्या 

    महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला किंवा लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलला भेट द्या. तिथे देण्यात आलेल्या अद्यतने आणि सूचना तपासा.  

    eKYC करणे अनिवार्य 

    राज्यातील महिलांना आर्थिकदृष्टा मजबूत करण्यासाठी राज्यात सरकारने "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजना (Ladki Bahin Yojana) सुरु करण्यात आली. या योजनाची सुरुवात ही 28 जून 2024 रोजी झाली होती. या योजनेमार्फत महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. 1500/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येत आहे. जवळपास अडीच कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. आता या महिलांना eKYC करणे अनिवार्य आहे.

    लाडकी बहीण योजनेची eKYC कशी करावी (How to do eKYC for Ladki Bhain Yojana)

    1. मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेची eKYC करण्यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
    2. मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल.
    3. या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit बटणावर क्लिक करावे.
    4. यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही.
    5. * जर आधीच पूर्ण झाली असेल, तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.

    हेही वाचा - Farm Loan Recovery: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्र सरकारने शेती कर्जवसुलीला दिली स्थगिती