जेएनएन, मुंबई. Ladki Bahin Scheme: महायुती सरकारची महत्वकांक्षी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण'वरुन सरकारमध्ये सध्या महाभारत सुरू आहे. अनेक विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविला जात आहे, यावरून याआधी विभागाचे मंत्री नाराज होते. मात्र आता आमदार निधी सुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी वळविला जात असल्याने आमदार नाराजी व्यक्त करत आहे.
अनेक मंत्री आणि आमदारांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. लाडकी बहीण योजनेच्या निधीवरून शिवसेना आमदाराची नाराजी वाढत चालली आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट निधीवरून अजित पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती.
आता आमदार आमश्या पाडवी यांनीही निधी वळवण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. आदिवासी विभागाचा निधी वळवू नये म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहीले आहे. आता महायुती सरकारमध्ये लाडकी बहीण योजनेविरोधातली सरकारमधील खदखद समोर आली आहे. अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेला लागणाऱ्या निधीबद्दल उघडपणे अनेक आमदार आणि मंत्र्यांना तंबी दिली आहे.
