जेएनएन, मुंबई. Ladki Bahin Scheme: महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. शासकीय सेवेत राहून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलाकडून 1500 रुपयांची वसूली सरकार करणार आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. 

शिस्तभंगाची कारवाई होणार

शासकीय सेवेत राहून योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांवर शिस्तभंगाची कारवाई देखील होणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली आहे.

शासकीय सेवेत लाभ घेणाऱ्या महिलांची पात्रता निकषांच्या आधारावर चौकशी सुरू आहे. या योजनाची डिजिटल पडताळणी यंत्रणाचा आधार घेऊन चौकशी केली जात आहे.

सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी पात्रतेविना लाभ घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे, या महिलांचा लाभ तातडीने बंद करण्यात आला आहे, अशी माहिती तटकरे यांनी दिली आहे. महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे  यांनी विधानसभेत लेखी उत्तर दिले आहे. 

    2,289 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ 

    2,289 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी पात्र नसतानाही योजनेचा लाभ घेतला आहे. या महिलांना मिळणारा मासिक 1500 रुपये थेट थांबविले आहे. ही रक्कम आता संबंधित महिलांकडून वसूल करण्यात येणार असल्याची माहितीही आदिती तटकरे यांनी दिली आहे.

    लाभ घेण्याची अट मोडणाऱ्यांवर योग्य…

    या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू महिलांना दरमहा 1500 रुपये दोषी आढळलेल्या महिला कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण रक्कम वसूल केली जाईल. लाभ घेण्याची अट मोडणाऱ्यांवर योग्य ती शिस्तभंगाची कारवाई देखील केली जाणार आहे, अशी माहिती तटकरे यांनी दिली आहे.