जेएनएन, मुंबई. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
माझ्या लाडक्या बहिणींसाठी फेब्रुवारीचा सन्मान निधी वितरणास सुरूवात झाली आहे. येत्या 3 दिवसांत थेट खात्यात जमा होणार अशी माहिती फडणवीसांनी ट्वीटद्वारे दिली आहे.
ekyc अर्जात 31 मार्चपर्यत दुरुस्ती करता येणार
Ladki Bahin Yojana ekyc portal: ई-केवायसी करताना चुकीची माहिती दिल्याने अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाला होता. यामुळे महिलांमध्ये नाराजी होती, याची दखल घेत सरकारकडून लाडकी बहीण ई-केवायसी पोर्टल आजपासून सुरू करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ई-केवायसी पोर्टल बंद असल्याने महिलांमध्ये संभ्रम होता. आता राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने आदेश काढून पोर्टल सुरू केले असून महिलांना आपल्या अर्जात 31 मार्चपर्यत दुरुस्ती करता येणार आहे.
लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरची घोषणा
दरम्यान आता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देताना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून या हेल्पलाईनची घोषणा केली.
लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जात असून, या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळत आहे. मात्र, अलीकडच्या काळात ई-केवायसी संदर्भातील त्रुटी, बँक खात्याशी संबंधित अडचणी, तसेच हप्ता थांबण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत होत्या. याच पार्श्वभूमीवर सरकारने 181 हेल्पलाईन नंबर (Ladki Bahin Yojana helpline number) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
