जेएनएन, मुंबई. Ladki Bahin Yojana: महायुती सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर दिली आहे. लाडकी बहीण योजनेतील फेब्रुवारीचा हप्ता आजपासून मिळणार (February installment) आहे. यासाठी अर्थ खात्याने 3490 कोटी रुपये वर्ग केले आहे.

फेब्रुवारीत लाभार्थींची संख्या घटली

यावेळी लाडकी बहीण लाभार्थींची (Ladki Bahin Scheme) संख्या कमी असणार आहे. पहिल्या टप्यात 4 लाख महिला लाभार्थीं अपात्र केले असून दुसऱ्या टप्यात 5 लाख लाभार्थींना अपात्र करण्यात आले आहेत. लाडकी बहीण योजनेत जानेवारीच्या तुलनेमध्ये फेब्रुवारीत लाभार्थींची संख्या घटली आहे.

9 लाख महिलांची नावे केली कमी

लाडकी बहीण योजनेत डिसेंबर अखेर 2 कोटी 46 लाख महिला लाभार्थी होत्या. त्यातील 5 लाख महिला अपात्र झाल्यानंतर जानेवारी अखेर 2 कोटी 41 लाख लाभार्थी महिला होत्या. या योजनातून आतापर्यंत 9 लाख महिलांची नाव कमी करण्यात आले आहे.

    लाडकी बहिण योजनेचे काही निकष बदलले (Ladki Bahin Yojana New Criteria)

    नुकतेच महाराष्ट्र शासनानं लाडकी बहिण योजनेचे काही निकष बदलले आहेत. या निकषामुळे आता लाडकी बहिण योजनेतील लाभ मिळणाऱ्या महिलांची संख्या आणखी कमी होणार आहे. लाडकी बहिण योजना ही गरीब महिलांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशांनी मागील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने आणली होती.

    2100 रुपये हप्ता कधी होणार?

    विधानसभा निवडणुकीत ही योजना महायुतीसाठी वरदान ठरली आणि राज्यात महायुतीला मोठे मताधिक्य मिळाले. विधानसभा निवडणुकांदरम्यान महायुतीने महिलांना लाडकी बहिण योजनेचा हफ्ता हा 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिलं होतं. त्यानुसार येत्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी निधीची भरीव तरतूद होण्याची शक्यता आहे.

    लाडकी बहीण योजनेचे नवीन निकष

    • लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-केवायसी करून हयातीत असल्याचा दाखलाही जोडावा लागणार आहे.
    • दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी करणे अनिवार्य असणार आहे. 
    • ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही योजनेतून बाद केले जाईल.
    • अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असल्यास महिलांना अपात्र घोषित केले जाईल.
    • लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेणार आहे.
    • नव्याने पात्र लाभार्थी महिलांना जुलैपासून लाभ मिळणार नाही.
    • अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ मिळणार आहे.
    • अर्जातील नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यामध्ये तफावत आढळल्यास अपात्र केले जाईल.
    • नमो योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना १५०० रुपये दिले जाणार नाही.

    हेही वाचा - Marathi Sahitya Sammelan 2025: पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन