जेएनएन, मुंबई. Ladki Bahin Yojana E-KYC portal: ई-केवायसी करताना चुकीची माहिती दिल्याने अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाला होता. यामुळे महिला व बालविकास विभागाने आदेश काढून पोर्टल पुन्हा सुरू केले आणि महिलांना आपल्या केवायसीत दुरुस्ती करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत तारीख दिली होती. आता यासाठी शेवटचे चार दिवस बाकी आहेत.

जेएनएन, मुंबई. Ladki Bahin Yojana e-kyc: राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 

लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana Latest News) ही राज्य सरकारची एक प्रमुख कल्याणकारी योजना आहे, ज्याअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये मदत मिळताता. मात्र, या योजनेत काही अपात्र उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळे सरकारने सर्व लाभार्थ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले होते. याची अंतिम तारीख 31 डिसेंबर होती. या केवायसीत काही तुत्री झाल्याच्या तक्रारी येत असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली होती. त्यानंतर त्यांनी या तुत्री दूर करण्यासाठी पुन्हा मुदत वाढ दिली होती.

30 एप्रिलपर्यंत e-KYC दुरुस्ती करण्याची मुदत!  

महिला व बालविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता लाभार्थी महिलांना 30 एप्रिलपर्यंत e-KYC प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. या कालावधीत e-KYC पूर्ण करणाऱ्या पात्र महिलांना योजनेचा लाभ पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून रखडलेले मानधन लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

    लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरची घोषणा 

    दरम्यान आता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देताना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून या हेल्पलाईनची घोषणा केली. 

    लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जात असून, या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळत आहे. मात्र, अलीकडच्या काळात ई-केवायसी संदर्भातील त्रुटी, बँक खात्याशी संबंधित अडचणी, तसेच हप्ता थांबण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत होत्या. याच पार्श्वभूमीवर सरकारने 181 हेल्पलाईन नंबर (Ladki Bahin Yojana helpline number) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.