जेएनएन, मुंबई. Ladki Bahin Yojana: राज्यातील मागील विधानसभा निवडणुकांत एकनाथ शिंदे सरकारने सुरु केलेली लाडकी बहीण योजना मैलाचा दगड ठरली होती. असे म्हटलं जाते. आता राज्यात सुरु असलेल्या महानगरपालिकांच्या पुर्वी महायुती सरकार हे लाडक्या बहिणींना संक्रातीच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 3000 रुपये देणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. दरम्यान, काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे हे पैसे देऊ नयेत, अशी मागणी करणारे पत्र लिहिले आहे, असं मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. त्यांनी काँग्रेसवर टीकाही केली आहे.

चंद्रशेखर बावणकुळे काय म्हणाले…

“काँग्रेसचा लाडकी बहिणी द्वेषाचा क्रूर चेहरा उघड !

महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींबद्दलचा द्वेष काँग्रेसमध्ये ठासून भरला आहे. तो वरचेवर उफाळून येतो. आमच्या माता- भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद काँग्रेसला व काँग्रेस नेत्यांना बघवत नाही. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली, त्यावेळी ही योजना बंद करा म्हणून काँग्रेस समर्थक कार्यकर्त्याने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. 

आता तर, काँग्रेसने हद्द पार केली. 

बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतात. बहिणींच्या संसाराला आधार मिळतो. हातभार लागतो. माझ्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. तर,पुन्हा काँग्रेसवाल्यांचा द्वेष, मत्सर, आकस उफाळून आला. 

    काँग्रेसवाल्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे बहिणींना देऊ नका, असे पत्र महाराष्ट्र निवडणूक आयोगाला दिले. नात्यात विष कालवणारी ही काँग्रेसची जहरी विचारधारा, आता सर्वांसमोर आली.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात संक्रांतीच्या पर्वावर दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा करत आहे. 

    तर, ही रक्कम लाडक्या बहिणींना देऊ नका, म्हणून काँग्रेसने महाराष्ट्र निवडणूक आयोगाला पत्र दिले.

    आम्ही काँग्रेसच्या विकृत कृतीचा निषेध करीत आहोत. 

    काँग्रेसला या राज्यातील आमच्या माता- भगिनी कधीही माफ करणार नाहीत. 

    काँग्रेसचा खरा चेहरा आता पुढे आला आहे” अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

    हेही वाचा - Mahayuti Manifesto: बीएमसीसाठी महायुतीचा वचननामा जाहीर! वचननाम्यातील महत्त्वाच्या घोषणा कोणत्या? वाचा सविस्तर…