जेएनएन, मुंबई. Ladki Bahin Scheme: राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहिण योजनेतून सुमारे 50 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. यापुढे या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.

राज्य सरकारने घेतलेल्या तपासणीत या महिलांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. त्यामुळे यापुढे त्यांना योजनेचा दरमहा आर्थिक लाभ मिळणार नाही.

अर्ज बाद होण्याचे कारण!

  • अर्ज अपूर्ण किंवा चुकीची माहिती दिल्यास 
  • पात्रतेच्या निकषांचे उल्लंघन केल्याने अर्ज बाद करण्यात आले आहे.
  • काही अर्जदार आधीपासूनच सरकारी योजनेचा लाभ घेत आहे

यामुळे लाडकी बहिण योजनेतून मोठ्या प्रमाणावर महिलांना वगळण्यात आले आहे. सरकारकडून अर्जांची पुन्हा एकदा छाननी सुरू असून फक्त पात्र महिलांनाच लाभ देण्याचा निर्णय राज्यसरकार कडून  घेण्यात आला आहे.

लाडकी बहिण योजनेचे निकष (Ladki Bahin Scheme Criteria) 

  • लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-केवायसी करून हयातीत असल्याचा दाखलाही जोडावा लागणार आहे.
  • दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी करणे अनिवार्य असणार आहे 
  • ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही योजनेतून बाद केले जाईल.
  • अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असल्यास महिलांना अपात्र घोषित केले जाईल.
  • लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेणार आहे.
  • नव्याने पात्र लाभार्थी महिलांना जुलैपासून लाभ मिळणार नाही.
  • अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ मिळणार आहे.
  • अर्जातील नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यामध्ये तफावत आढळल्यास अपात्र केले जाईल.
  • नमो योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना 1500 रुपये दिले जाणार नाही.

हेही वाचा - BMC Election 2025: कोणीही युती केली तरी मुंबई पालिकेचा महापौर महायुतीचाच होणार- फडणवीसांचा दावा