जेएनएन, मुंबई Marathi Bhasha Diwas: महाराष्ट्राची प्रमुख भाषा म्हणजेच मराठी ज्याचा अभिमान प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाला आहे. हीच मराठी भाषा समृद्ध करण्याचं आणि जगभर पसरविण्याच काम हे मराठीत नामवंत साहित्यिकांनी केले आहे. मराठी दर्जेदार साहित्य लिहून त्यांनी या भाषेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. भारतातील प्रमुख भाषांमध्ये मराठी भाषा उच्च समजली जाते आणि मराठी बोलणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. याच मराठीचा मान व्हावा, तिचा आदर केला जावा याच उद्देशाने दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा केला जातो.
मराठीचा गौरव करत ती आपल्या साहित्याच्या माद्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहाचविण्यासाठी मराठी भाषा ज्ञानभाषा करण्यासाठी परिश्रम घेणारे प्रतिभावंत साहित्यिक वि.वा.शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून सन 2013 पासून साजरा केला जातो. ज्या भाषेमुळे आपली एकमेकांशी विचारांची देवाण-घेवाण होते. राज्यातील प्रत्येक व्यवहार, कामकाज याच भाषेतून केली जातात. वसंतराव नाईक सरकारने महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर केले होते. 'मराठी राजभाषा अधिनियम 1964' 11 जानेवारी 1965 रोजी प्रसिद्ध केला. व सन 1966 पासून तो अंमलात आणला गेला. पुढे मराठी भाषा संवर्धनासाठी वसंतराव नाईक सरकारने राज्यात भाषा संचालनालयाची निर्मिती केली. तसेच प्रादेशिक स्तरावर चार केंद्राची स्थापना करून जाहीर केले की, राज्यकारभार मराठीतून चालणार असे. मराठी भाषा गौरव दिवस आणि मराठी राजभाषा दिवस हे दोन्ही दिवस भिन्न आहेत.
जगभरातील मराठी भाषिकी 27 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करतात.
मराठीतील थोर कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ 'कुसुमाग्रज' यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
शासन निर्णयानुसार कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक 21 जानेवारी इ.स. 2013 रोजी घेण्यात आला.
भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 347 नुसार लक्षणीय प्रमाणात लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेला राष्ट्रपतींना राजभाषा म्हणून मान्यता देण्याची तरतूद व अधिकार आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेता. 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून घोषित करण्यात आले.
2014 मध्ये पहिल्यांदा 27 फेब्रुवारी रोजी "मराठी भाषा गौरव दिन" साजरा केला गेला.