जेएनएन मुंबई. KES College Kandivali Bomb Threat: कांदिवली पश्चिमेतील केईएस कॉलेजला आज बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई-मेल आला होता. पोलिसांचे एक पथक कॉलेजमध्ये पोहोचले आहे आणि प्रकरणाची चौकशी करत आहे. हा ई-मेल कॉलेजच्या अधिकृत ई-मेल आयडीवर पाठवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

पथक घटनास्थळी पोहोचले

कांदिवली पश्चिमेतील केईएस कॉलेजला (KES College Kandivali) बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा एक ई-मेल पात्र झाला होता. त्यानंतर आमचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. ते परिसराची तपासणी करत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

कॉलेजच्या अधिकृत ई-मेल आयडीवर मेल

केईएस कॉलेजच्या अधिकृत ई-मेल आयडीवर ई-मेल आला आहे. या मेलचा पुढील तपास पोलिस करत आहेत, असं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे. 

    कॉलेजमध्ये खळबळ

    केईएस कॉलेजला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा एक ई-मेल पात्र झाला आणि परिसरात पोलिस आल्यानं विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली होती. यानंतर कॉलेज प्रशासन विद्यार्थांना न घाबरण्याचे आवाहन केलं. पोलिस परिसराची तपासणी करत आहेत.

    हेही वाचा - Virat Kohli ची फॉर्ममध्ये परतण्याची धडपड: माजी प्रशिक्षकांसोबत विशेष सराव, रणजीमध्ये करेल मदत?

    जोगेश्वरीतील शाळेलाही धमकीचा मेल

    काही दिवसांंपूर्वी मुंबईतील जोगेश्वरी-ओशिवरा भागातील एका शाळेत बॉम्बच्या धमकीच्या ईमेल आला होता. शाळेनं सुरक्षा यंत्रणांना तात्काळ माहिती दिली होती. त्यानंतर स्थानिक कायदा अंमलबजावणी आणि स्फोटक शोधक कर्मचाऱ्यांना परिसराची सखोल तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आले होते, मात्र, त्याठिकाणी काही सापडले नव्हते.

    कपील शर्मालाही धमकी

    कॉमेडियन कपील शर्मालाही ईमेल व्दारे जीवे मारण्याची (Kapil Sharma Death Threat) धमकी देण्यात आली होती. याशिवाय राजपाल यादव यांची पत्नी राधा यादव यांनी मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली होती.