जेएनएन, मुंबई: रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा तिढा सोडविण्यासाठी आज महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडणार (Mahayuti Govt Meeting today) आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आज महत्वाची बैठक पार पडणार आहे.
दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय
रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याच्या निर्णयावरून राजकारण तापले होते. शिवसेना व राष्ट्रवादीने दबावाचे राजकारण सुरू केले होते. या वादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय असाच प्रलंबित ठेवला होता मात्र आज हा तिढा बैठकीत सुटणार असल्याचे चिन्हे आहेत.
हेही वाचा - Mauni Amavasya 2025: मौनी अमावस्येला करा तिळाशी संबंधित हे उपाय, मिळेल पितरांचा आशीर्वाद!
महायुतीत धुसफूस
रायगडमध्ये आदिती तटकरे व नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आले आहे. यावरून Mahayuti त धुसफूस सुरू झाली आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
हेही वाचा - Share Market Crash Today: ट्रम्पच्या टॅरिफमुळे स्टॉक मार्केटमध्ये कहर, सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण
पालकमंत्रीपद आपल्यालाच पाहिजे!
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळाले पाहिजे, अशी मागणी भरत गोगावले यांनी केली आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदावर राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे व शिवसेनेचे दादा भुसे यांनी दावा केला आहे.
हेही वाचा - VIDEO: तिरंग्याचा अपमान करणाऱ्या खलिस्तान्यांना भारतीयांनी दिले सडेतोड उत्तर, लंडनमध्ये संताप
परदेशातून स्थगिती
नाशिक आणि रायगड जिल्हाच्या पालकमंत्री पदाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेशातून स्थगिती दिली आहे. सरकार स्थापन करताना मुख्यमंत्रीपदावरून वाद होता. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटपावरून वाद आणि आता पालकमंत्रीपदासाठी वाद सुरू आहेत.
पालकमंत्रीपद कोणाला मिळणार?
मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर गेले पण त्यांनी नाशिक व रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती द्यावी लागली. आज ही स्थगिती उठण्याची शक्यता आहे. आजच्या महायुतीच्या बैठकीनंतर पालकमंत्रीपद कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.