जेएनएन, ठाणे. ठाणे मेट्रोची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते पहिला ट्रायल रन झाला. मेट्रो सुविधामुळे ठाणेकरांचा प्रवास सुखकर होणार आहे. या ट्रायल रनसाठी उपमुख्यमंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
या मेट्रो मार्गाला मोठे महत्त्व
मेट्रोमुळे ठाणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. विशेषतः घोडबंदर रोडवरील वाढता ताण लक्षात घेता या मेट्रो मार्गाला मोठे महत्त्व आले आहे. पहिली ट्रायल रन आनंद नगर परिसरातून पार पडली.
या ट्रायल रननंतर ठाण्यातील नागरिकांना मेट्रो सेवेचा लाभ मिळणार आहे. तांत्रिक कामांची चाचणी, सुरक्षेचे परीक्षण तसेच यंत्रणांची तपासणी या प्रक्रियेत केली जाणार आहे.
घोडबंदर रोडवरील वाहनांचा ताण कमी होणार
दरम्यान ठाणेतील मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे व मुंबईतील प्रवास सुलभ होणार आहे. घोडबंदर रोडवरील वाहनांचा ताण कमी होणार आहे. प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे. तर आज मेट्रो ट्रॉयलसाठी महापालिका व मेट्रो प्रशासनाने पूर्ण तयारी केली होती, अशी माहिती नवी मुंबई मेट्रो प्रशासनाने दिली आहे.
◻️LIVE📍 ठाणे 🗓️ 22-09-2025 📹 मेट्रो 4 व 4ब - पाहणी दौरा - लाईव्ह https://t.co/dKAGnu17ON
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 22, 2025
उपनगरांमधील दुवा मजबूत होणार
गायमुख-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गाचाही लवकरच पायाभरणी केली जाईल, ज्यामुळे घोडबंदर मार्गावरील दीर्घकालीन वाहतूक कोंडी कमी होईल. मेट्रो लाईन 4 पूर्ण झाल्यानंतर, मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील दुवा मजबूत करेल, ज्याचा थेट फायदा व्यावसायिक केंद्रे, औद्योगिक क्षेत्रे आणि शैक्षणिक संस्थांना होईल, अशी प्रतिक्रिया मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
मुंबई मेट्रो मार्ग 4 ग्रीन लाईन
प्रकल्पाचा आधारभूत खर्च हा 14, 549 कोटी रुपये आहे. मुंबई मेट्रो मार्ग 4 हा मेट्रो मार्ग ग्रीन लाईन म्हणून ओळखला जाईल.
मुंबई मेट्रो मार्ग 4 (वडाळा -कासारवडवली)
- वडाळा ते कासारवडवली दरम्यान, मेट्रो मार्ग 4 कॉरिडोर होणार असून त्यात 30 स्थानक असणार आहेत.
- यामुळे विद्यमान पूर्व द्रुतगती मार्ग, मध्य रेल्वे, मोनो रेल, सध्या सुरू असलेला मेट्रो मार्ग 2बी (डी एन नगर ते मंडळे), मेट्रो मार्ग 5 (ठाणे ते कल्याण), मेट्रो मार्ग 6 (स्वामी समर्थ नगर ते विक्रोली) यांच्यात आंतरजोडणी उपलब्ध होईल.
- हे मुंबईतील व्यावसायिक, सरकारी संस्था आणि भौगोलिक खुणांना रेल्वे आधारित प्रवेश प्रदान करेल.
- यामुळे रस्त्यांच्या परिस्थितीनुसार सध्याचा प्रवासाचा वेळ 50 ते 75 टक्क्यांनी कमी होईल.
मुंबई मेट्रो मार्ग 4 मार्गावरील स्थानके
- भक्ती पार्क मेट्रो,
- वडाळा टी टी,
- अनिक नगर बस डेपो,
- सिद्धार्थ कॉलनी,
- गारोडिया नगर,
- पंत नगर,
- लक्ष्मीनगर,
- श्रेयस सिनेमा,
- गोदरेज कंपनी,
- विक्रोली मेट्रो,
- सूर्यनगर,
- गांधी नगर,
- नेव्हल हाऊसिंग,
- भांडुप महापलिका,
- भांडुप मेट्रो,
- शांग्रिला,
- सोनापूर,
- मुलुंड अग्निशमन केंद्र,
- मुलुंड नाका,
- ठाणे तीन हाथ नाका,
- आरटीओ ठाणे,
- महापलिका मार्ग,
- कॅडबरी जंक्शन,
- माजीवाडा,
- कपूरबावडी,
- मानपाडा,
- टिकुजी-नी-वाडी,
- डोंगरीपाडा,
- विजय गार्डन,
- कासारवडवली
हेही वाचा - एकनाथ शिंदे यांचे एक्स अकाउंट हॅक, पाकिस्तानी आणि तुर्की ध्वजांचे फोटो पोस्ट