जेएनएन, मुंबई: राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात (MSRTC) तब्बल 17,450 पदांसाठी मेगाभरती होणार आहे. यात चालक आणि सहाय्यक पदांचा समावेश आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 30 हजार रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात गेल्या काही वर्षांपासून कर्मचारीसंख्या अपुरी असल्याने प्रवाशांना अनेकदा गैरसोयींचा सामना करावा लागत होता. याच पार्श्वभूमीवर ही मोठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. भरती प्रक्रियेनंतर निवड झालेल्या उमेदवारांना एसटीकडून विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे चालक व सहाय्यकांना कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे.
भरतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार असून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, लेखी परीक्षा, वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी आणि कागदपत्रांची पडताळणी या टप्प्यांमधून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या मेगाभरतीमुळे राज्यातील हजारो तरुणांना रोजगाराची सुवर्णसंधी मिळणार असून एसटीच्या प्रवासी सेवेतही मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा: Zilla Parishad Election: जिल्हा परिषद निवडणूक मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय!