जेएनएन, मुंबई. Jitendra Awhad Gopichand Padalkar Row : विधानभवन गेटवर मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास तुफान राडा झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कार्यकर्त्याच्या अटकेच्या निषेधार्थ पोलिसांच्या गाडीखाली घुसून आंदोलन केले. पोलिसांनी आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख यांना विधानभवनाच्या मागच्या गेटवरून अटक करून नेत असताना, आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी पोलिसांची गाडी अडवून ठिय्या आंदोलन सुरू केले.
दरम्यान पोलिसांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना गाडीखालून फरफडत बाहेर काढले. या प्रकरणात आव्हाड यांचा कार्यकर्ता देशमुखला अटक करण्यात आली आहे. याआधी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या कार्यकर्तामध्ये विधानभवनात हाणामारी झाली होती. पडळकर यांच्या कार्यकर्तानी आव्हाडच्या कार्यकर्त्यांना विधानभवनाच्या लॉबीतच मारहाण केली.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड !
खरा मारहाण करणाऱ्या मारेकरीला सोडून दिले आणि आमच्या कार्यकर्त्याला अटक केली असा थेट आरोप आव्हाड यांनी पोलिसांवर केला आहे. पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा, आरोपही आव्हाड यांनी केला.
पडळकर यांच्या गुंडांनी माझा कार्यकर्ता नितीन देशमुख विधानभवनात याला मारहाण केली.यानंतर मारहाण करणारे विधानभवनातून पळून गेले.शिवाय पोलिसांनी माझ्याच मार खाणाऱ्या कार्यकर्त्याला पकडलं.आणि विधानसभा सचिवांनी माझ्याच कार्यकर्त्याला पोलिस स्टेशनला नेण्याचा घाट घातला आहे.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 17, 2025
म्हणजे मार… pic.twitter.com/U3Jfnuyzm9
पडळकर यांच्या गुंडांनी माझा कार्यकर्ता नितीन देशमुख विधानभवनात याला मारहाण केली.यानंतर मारहाण करणारे विधानभवनातून पळून गेले.शिवाय पोलिसांनी माझ्याच मार खाणाऱ्या कार्यकर्त्याला पकडलं.आणि विधानसभा सचिवांनी माझ्याच कार्यकर्त्याला पोलिस स्टेशनला नेण्याचा घाट घातला आहे.
म्हणजे मार खाणार आमचा कार्यकर्ता,पळून जाणार पडळकर चे कार्यकर्ते आणि प्रशासन पकडून कारवाई कोणावर करत आहे तर आमच्याच कार्यकर्त्यांवर..!सत्ताधाऱ्यांना इतक शरण गेलेलं प्रशासन मी आजवर पाहिल नव्हतं. या अधिकाऱ्यांकडे आत्मसन्मान नावाची काही गोष्टच नाही. मी इतकच सांगतो, माझ्या कार्यकर्त्याला सोडल्याशिवाय मी उठणार नाही, असे म्हणत आव्हाड यांनी पोलीस व्हॅनसमोर आंदोलन करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शदर पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधिमंडळाच्या लॉबीतच जोरदार हाणामारी. #GopichandPadalkar #JitendraAwhad #monsoonsession pic.twitter.com/zSpaTgfP1H
— SHRIKANT LONDHE (@shrikantalondhe) July 18, 2025
काय आहे प्रकरण !
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनात हाणामारी झाली आहे. विधानभवनाच्या लॉबीतच दोघांचे कार्यकर्ते भिडले. जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण झाली आहे. गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले यांनी ही मारहाण केली आहे. काल देखील जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये विधान भवनमध्ये वाद झाला होता. मात्र, काल विधानभवनाच्या लॉबीतच जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते भिडल्याने सुरक्षाचे प्रश्न निर्माण झाला. विधानभवनाच्या लॉबीत झालेल्या मारहाणीचा मुद्दा विधानसभेत देखील गाजला.