जेएनएन, मुंबई. Maharashtra Politics: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीच्या समा दिवस होता. त्यांच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना जाहीर ऑफर दिली होती. ‘उद्धवजी आता 2029 पर्यंत काही करायचं नाही. आम्हाला तिकडे यायचा स्कोप उरला नाही. मात्र तुम्हाला इकडे यायचा स्कोप आहे. त्यावर वेगळ्या पद्धतीने विचार करता येईल. आपण वेगळ्या पद्धतीने बोलू.’ असं फडणवीस यांनी म्हटलं होतं.

ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट

फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आज शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. 

विरोधी पक्षनेतेपदावर चर्चा

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली,  ही भेट विरोधी पक्षनेतेपदावर चर्चा करण्यासाठी झाली असल्याची माहिती आहे.

बातम्यांचा दिला संग्रह भेट

    यावेळी उद्धव ठाकरे यांनी आज देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात तिसऱ्या भाषेच्या कल्पनेला आणि हिंदी लादण्याच्या कल्पनेला विरोध करणाऱ्या बातम्यांचा संग्रह भेट दिला, अशी माहिती ठाकरे गटाकडून देण्यात आली आहे.

    आमचे आता सध्या विचार वेगळे

    शिवसेना प्रमुख (यूबीटी) उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याबद्दल भाजप आमदार राम कदम म्हणाले, "विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. स्वाभाविकच, ते देखील आमदार असल्याने ते अधिवेशनाला उपस्थित राहिले आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आमची विचारसरणीची लढाई आहे - त्यांचे वेगळे आहेत, आमचे वेगळे आहेत. आपण हिंदुत्वाबद्दल बोलतो, तर उद्धव ठाकरेंचा पक्ष 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देणाऱ्यांच्या पाठीशी उभा आहे..."