डिजिटल डेस्क, नवी दिल्ली: भारतीय निवडणूक आयोग आज, रविवार, 15 मार्च रोजी पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या तारखांची घोषणा केली.
पाच राज्यातील निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम -
या वर्षी पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत: पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी.
बारामती, राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक जारी
बारामतीची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान तर 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने येथील आमदाराचे पद रिक्त झाले होते.
तसंच, राहुरी विधानसभा मतदार संघाची देखील निवडणूक होणार आहे. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने हे पद रिक्त झाले होते.
बारामती-राहुरी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम
| निवडणूक कार्यक्रम | तारीख आणि वार |
| अधिसूचना जारी करण्याची तारीख | 30.03.2026 (सोमवार) |
| नामनिर्देशन पत्रे भरण्याची अंतिम तारीख | 06.04.2026 (सोमवार) |
| नामनिर्देशन पत्रांच्या छाननीची तारीख | 07.04.2026 (मंगळवार) |
| उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख | 09.04.2026 (गुरुवार) |
| मतदानाचा दिनांक | 23.04.2026 (गुरुवार) |
| मतमोजणीची तारीख | 04.05.2026 (सोमवार) |
| निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याची तारीख | 06.05.2026 (बुधवार) |
