जेएनएन, मुंबई:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सायंकाळी 6 वाजता शिवतीर्थ निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मुंबई मनसे अध्यक्ष, विभाग अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असून, या बैठकीत राज ठाकरे “मिशन मुंबई”ची दिशा आणि पुढील रणनिती ठरवणार आहेत.
या बैठकीत राज ठाकरे आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन बळकटीकरण, प्रचार धोरण आणि उमेदवार निवड प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणार आहेत. मनसेसाठी मुंबई ही नेहमीच राजकीय दृष्ट्या महत्त्वाची ठरली आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बैठकीचे मुद्दे
- मुंबईतील सर्व विभागांची निवडणूक तयारीचा आढावा!
- स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवण्याच्या सूचना!
- पक्षाच्या प्रमुख प्रचार मोहिमेचा आराखडा तयार करणे!
- तरुण मतदार आणि स्थानिक प्रश्नांवर आधारित प्रचाराची आखणी!
निवडणुकीसाठी जबाबदाऱ्या निश्चित करणे
माहितीनुसार, राज ठाकरे यांचा भर "मुळ मुंबईकरांच्या प्रश्नांवर आणि स्वच्छ प्रशासनावर" राहणार आहे. विशेषतः मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि पायाभूत सुविधांवरील दुर्लक्ष या विषयांवर मनसे लक्ष केंद्रित करणार आहे.
हेही वाचा: राज्यात आजपासून निवडणुकीची रणधुमाळी; 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी अर्ज भरण्यास सुरुवात
