जेएनएन, मुंबई: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी राज्य सरकारने नुकतेच हैदराबाद गॅझेट लागू केले. मात्र, या निर्णयामुळे ओबीसींचे आरक्षण धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ओबीसी नेत्यांनी सरकारला थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. ओबीसी संघटना दसऱ्यानंतर मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
आंदोलनाची तयारी!
दसऱ्यानंतर मुंबईत ओबीसी नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल होणार आहेत.
या आंदोलनासाठी वेगवेगळ्या संघटनांमध्ये हालचाली सुरू आहेत.
ओबीसींच्या प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास थेट रस्त्यावर उतरावे लागेल, अशी भूमिका नेत्यांनी घेतली आहे.
असा असणार लढा!
न्यायालयीन पातळीवर - मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारच्या जीआरविरोधात कोर्टात जाण्याची तयारी केली आहे.
जनआंदोलन- काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महामोर्चाची घोषणा केली आहे. राज्यभरातून ओबीसी समाज एकत्र करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुलभ
मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत नवीन शासन निर्णय (जीआर) काढला होता. या जीआरमध्ये हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदींवरून मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली.
