जेएनएन, मुंबई. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभवनंतर काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल सुरू आहेत. काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात प्रदेश अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती केली असून आमदार विजय वड्डेटीवार यांना विधिमंडळ नेतेपद देण्यात आले आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती

तर अनुसूचित जमाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजी मोघे यांची राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून गच्छंती केली आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर नाना पाटोले यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेस पक्षाने पटोले यांचा राजीनामा मंजूर करून हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

हेही वाचा - Prabhakar Karekar: ‘बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल’चा आवाज हरवला, प्रसिद्ध गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचे मुंबईत निधन

मोघेंना अध्यक्षपदावरुन हटवले

माजी विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांची विधिमंडळ नेतेपद नियुक्ती करण्यात आली आहे. तर शिवाजी मोघे यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआदीच अध्यक्षपदावरून हटवून अनुसूचित जमाती सेलच्या अध्यक्षपदी डॉ विक्रांत भुरीया यांची निवड केली आहे.

    असा आहे हर्षवर्धन सपकाळ यांचा राजकीय प्रवास !

    1. विद्यामान राष्ट्रीय अध्यक्ष-  राजीव गांधी पंचायत राज संगठन
    2. ज्येष्ठ पक्ष निरिक्षक - ओडिसा लोकसभा/विधानसभा 2024
    3. राष्ट्रीय सचिव- अ.भा.काँ.कमेटी नवी दिल्ली- सह प्रभारी गुजरात- मध्यप्रदेश -पंजाब (दहा वर्ष)
    4. राष्ट्रीय उपाध्यक्ष-  राजीव गांधी पंचायत राज संगठन
    5. माजी अध्यक्ष- जिल्हा परिषद बुलढाणा (1999 ते 2002)
    6. माजी विधान सभा सदस्य- 22 बुलडाणा विधानसभा (2014 ते  2019)
    7. माजी सदस्य- जिल्हा परिषद बुलढाणा (1997 से 2006)
    8. शिबिर समन्वयक- गांधी विचार दर्शन सेवाग्राम (अ.भा.काँ.कमिटी द्वारा आयोजन)
    9. पक्ष निरिक्षक- अनेक राज्यांमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने.
    10. माजी उपाध्यक्ष- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

    हेही वाचा - का बदलला जात आहे 64 वर्षांपूर्वीचा कर कायदा; ग्रॅच्युइटी, पेन्शन आणि VRS मध्ये काय बदल झाले? वाचा सविस्तर!