मुंबई. GSB Seva Mandal insurance cover: मुंबई उपनगरात गणेशोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मंडप उभे राहिले असून, आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई आणि सुरक्षेच्या उपाययोजनांना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील बहुचर्चित GSB सेवा मंडळाच्या गणेशोत्सवाची तयारीही अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. विशेष म्हणजे, मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवासाठी तब्बल 703.27 कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला आहे.
GSB सेवा मंडळाच्या गणपतीला दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भाविक भेट देतात. गणेशमूर्तीवरील सोन्याचे दागिने, मौल्यवान वस्तू तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता मंडळाकडून सुरक्षेला विशेष महत्त्व दिले जाते. यंदाही संभाव्य धोके लक्षात घेऊन मंडळाने मोठ्या रकमेचे विमा संरक्षण घेतले आहे.
भाविकांची सुरक्षा हा मुख्य उद्देश
मंडळाच्या माहितीनुसार, हा विमा केवळ गणेशमूर्ती किंवा दागिन्यांपुरता मर्यादित नसून गणेशोत्सवाच्या कालावधीत मंडळाची एकूण जबाबदारी आणि भाविकांची सुरक्षा लक्षात घेऊन काढण्यात आला आहे. उत्सवादरम्यान मोठ्या संख्येने भाविक मंडपात आणि परिसरात दाखल होत असल्याने गर्दीचे व्यवस्थापन, अपघाताची शक्यता, आग, चोरी किंवा अन्य अनपेक्षित घटना यांसारख्या जोखमींचा विचार करण्यात आला आहे.
GSB सेवा मंडळाच्या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे गणेशमूर्तीला मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आणि मौल्यवान अलंकारांनी सजवले जाते. त्यामुळे या दागिन्यांच्या सुरक्षेची जबाबदारीही महत्त्वाची ठरते. विमा संरक्षणामुळे अनपेक्षित परिस्थितीत होणारे संभाव्य आर्थिक नुकसान कमी करण्यास मदत होणार आहे.
मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती मंडळांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंडळाने मागील वर्षांच्या तुलनेत आपल्या विमा संरक्षणात यंदा लक्षणीय वाढ केली आहे. हे विमा संरक्षण 2025 मध्ये 474कोटी रुपये आणि 2024 मध्ये 400 कोटी रुपये इतके होते.
जीएसबी (GSB) सेवा मंडळाचे संयोजक डॉ. भुजंग पै यांनी सांगितले की, भाविक तसेच उत्सवाशी संबंधित मौल्यवान दागिने आणि इतर मालमत्तेच्या संरक्षणासाठी हा विमा उतरवण्यात आला आहे.
महागणपती सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी सुशोभित -
महागणपतीच्या मूर्तीला 66 किलोहून अधिक सोन्याचे दागिने आणि 335 किलोहून अधिक चांदीचे दागिने, तसेच मौल्यवान रत्नांनी सजवले जाईल.
पै यांच्या माहितीनुसार, यातील अनेक दागिने आणि मौल्यवान वस्तू भाविक व सेवादारांनी गेल्या काही वर्षांत देणगी म्हणून दिल्या आहेत.
सोने आणि चांदीच्या वाढत्या किमती हे या मूर्तीचे एकूण मूल्य आणि त्यासाठीचे विमा संरक्षण वाढण्यामागची प्रमुख कारणे आहेत.
या मूर्तीला 'नवसाला पावणारा विश्वाचा राजा' म्हणून ओळखले जाते.
मंडप परिसरात कडेकोट सुरक्षा
गणेशोत्सवाच्या काळात GSB सेवा मंडळाकडे भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने मंडळाकडून सुरक्षा व्यवस्थेवर विशेष भर दिला जातो. गर्दी नियंत्रणासाठी स्वयंसेवक, सुरक्षा कर्मचारी तसेच आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही आणि इतर सुरक्षा उपाययोजना करण्यात येतात.
दरवर्षी मंडळाच्या गणपतीच्या दर्शनासाठी मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून भाविक येतात. त्यामुळे दर्शनरांग, प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग, आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठीची व्यवस्था आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष नियोजन केले जाते.
703.27 कोटींच्या विम्यामुळे चर्चेला उधाण
गणेशोत्सवासाठी 703.27 कोटी रुपयांचा विमा काढल्याने यंदा GSB सेवा मंडळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गणेशोत्सवातील वाढती गर्दी आणि मंडळाकडे असलेल्या मौल्यवान दागिन्यांची सुरक्षा पाहता एवढ्या मोठ्या रकमेचे विमा संरक्षण घेण्यात आल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
गणेशोत्सव हा श्रद्धेचा उत्सव असला तरी मोठ्या सार्वजनिक मंडळांसमोर गर्दी व्यवस्थापन, भाविकांची सुरक्षा आणि मौल्यवान वस्तूंचे संरक्षण ही मोठी जबाबदारी असते. त्यामुळे विमा संरक्षणाबरोबरच सुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन नियोजन आणि भाविकांच्या सुरक्षित दर्शनावर यंदाही विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
