मुंबई. Ganesh Chaturthi 2026 Special Train: गणेश उत्सवाला गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सव चार दिवसांवर येऊन ठेपला असून गणेशोत्सवाच्या काळात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे विभागही सज्ज झाला आहे. गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला असून मुंबई-सावंतवाडी रोड, नांदेड-सांवतवाडी रोड नंतर  प्रवाशांच्या मागणीनुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मुंबई ते श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण आज, शुक्रवारपासून सुरू होणार आहे.

प्रवाशांच्या मागणीनुसार मध्य रेल्वेने गाडी क्रमांक 01417 मुंबई-कोल्हापूर ही गाडी 12 आणि 14 सप्टेंबरला दुपारी 2.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4.20 वाजता कोल्हापूरला पोहोचणार आहे. या गाडीचा परतीचा प्रवास (01418) 12 आणि 14 सप्टेंबरला मध्यरात्रीनंतर 12.05 वाजता सुरू होईल आणि ती त्याच दिवशी दुपारी 1.30 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. 

गाड्यांचे वेळापत्रक आणि फेऱ्या:

गाडी क्रमांक 01417 (विशेष गाडी): ही गाडी CSMT येथून 12 सप्टेंबर 2026 आणि 14 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 14.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 04.20 वाजता कोल्हापूर येथे पोहोचेल. (एकूण 2 सेवा)

गाडी क्रमांक 01418 (विशेष गाडी): ही गाडी कोल्हापूर येथून १२ सप्टेंबर 2026 आणि 14 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 00.05 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 13.30 वाजता CSMT येथे पोहोचेल. (एकूण 2 सेवा)

ट्रेनची संरचना: 1 वातानुकूलित प्रथम, 2 वातानुकूलित द्वितीय, 3 वातानुकूलित  तृतीय, 4 शयनयान, 4 सामान्य द्वितीय श्रेणी, 1 द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि 1 जनरेटर कार.

    आरक्षण कधी आणि कुठे सुरू होणार?

    गाडी क्रमांक 01418 आणि 01417 या गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण आज 11 सप्टेंबर 2016 रोजी सर्व PRS केंद्रांवर आणि IRCTC संकेतस्थळावर सुरू होईल. तसेच, सामान्य दरासह अनारक्षित डब्यांचे तिकीट UTS प्रणालीद्वारे काढता येईल. प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी 'रेलवन' (RailOne) ॲप देखील डाउनलोड करता येईल.