विनोद राठोड, मुंबई: Somnath Suryavanshi Murder Case: सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणात अखेर एफआयआर (FIR) नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणासाठी एसआयटी (SIT) समिती गठीत करण्यात आली आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत या प्रकरणात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. याच आधारावर आज एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामुळे सूर्यवंशी यांच्या मृत्यूमागील सत्य उघड करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष चौकशी समिती गठीत करण्याचेही आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आज चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. समितीमार्फत लवकरच सखोल तपास सुरू होणार आहे. अनेक वर्षांपासून या प्रकरणात न्यायासाठी लढा देणाऱ्या कुटुंबीयांसाठी हा मोठा दिलासा देणारा निर्णय ठरला आहे.

अशी घडली होती घटना!

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूमुळे महाराष्ट्रभर खळबळ उडाली होती. त्यांच्या हत्येचा आरोप काही लोकांवर करण्यात आला होता, मात्र एफआयआर दाखल करण्यात येत नसल्याने न्याय प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला होता. याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले, मात्र त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश!

    सूर्यवंशी हत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे आता एफआयआर दाखल झाला असून, विशेष चौकशी समितीमार्फत या प्रकरणाचा तपास सुरू केला जाणार आहे.