जेएनएन/ एजन्सी, मुंबई. Maharashtra Budget 2025 Reaction: गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या लोकाभिमुख योजना आणि पायाभूत सुविधा यांचा योग्य तो संतुलन राखणार हे चॅम्पियन बजेट अजित पवार यांनी मांडले आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या अर्थसंकल्पाविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. तर उद्धव ठाकरे यांनी हा अर्थसंकल्प पूर्णपणे बोगस अर्थसंकल्प आहे, अशी टीका केली आहे.

अमेरिकेसारख्या प्रगत देशाचा विकास हा रस्त्यांमुळे झाला आहे. आजच्या अर्थसंकल्पात रस्ते, पूल, बंदरे अशा पायाभूत सुविधांच्या विकासासाठी चांगली तरतूद केली आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आजच्या अर्थसंकल्पात एकही क्षेत्र सोडलेले नाही. औद्योगिक विकासात महाराष्ट्र आघाडीवर असून तो आणखीही पुढे राहील त्याचप्रमाणे गुंतवणुकी मोठ्या प्रमाणावर येईल अशा तऱ्हेने या अर्थसंकल्पामध्ये तरतुदी करण्यात आल्या आहेत.  

मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्राची क्षमता दीड ट्रिलियन डॉलर्स योगदानाची आहे. समृद्धी, अटल सेतू सारखे गेम चेंजर प्रकल्प गेल्या अडीच वर्षांत पूर्ण झाले आहेत. कुठल्याही प्रकारे या अर्थसंकल्पात योजनांना कात्री लावलेली नाही, उलट पायाभूत सुविधांच्या विकासांना या बजेटमध्ये वेग देण्यात आलेला आहे असे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विकास हाच आमचा अजेंडा असून लोकांचे कल्याण हेच आमचे ध्येय आहे. विकसित भारत घडवण्यामध्ये विकसित महाराष्ट्राचं योगदान अधोरेखित करणारा हा अर्थसंकल्प आहे असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले…

"हा अर्थसंकल्प पूर्णपणे बोगस अर्थसंकल्प आहे. त्यांनी (महायुती पक्षांनी) अनेक आश्वासने दिली होती परंतु त्यापैकी एकही या अर्थसंकल्पात प्रतिबिंबित झाले नाही," असे ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले. साखर कारखान्यांना बँक हमी देण्याच्या राज्य सरकारच्या योजनेबद्दल त्यांनी निराशा व्यक्त केली. 

    "भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने सत्ताधारी सरकारच्या जवळ असलेल्या साखर कारखान्यांना 1000 कोटी रुपयांची बँक गॅरंटी दिली आहे, तर बीएमसी (बृहन्मुंबई महानगरपालिका) ची 16000 कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित ठेवण्यात आली आहे. त्यामागील कारण काय आहे?" असा प्रश्न ठाकरेंनी विचारला.

    "जर विमानतळ अदानी समूहाचे व्यवस्थापन करत असेल तर महाराष्ट्र सरकार त्यांना जोडणारी मेट्रो लाईन बांधण्यासाठी करदात्यांच्या पैशांचा खर्च का करत आहे? मेट्रो लाईन बांधण्याचा खर्च अदानी समूहानेच करावा," असे ठाकरे म्हणाले.