जेएनएन, मुंबई: मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मुंबई शहरातील मूलभूत सुविधा बंद करण्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोसियल मीडियावर पोस्ट टाकून केला आहे. माहितीनुसार, अनेक रेल्वे स्थानकांवरील व सार्वजनिक ठिकाणांवरील स्वच्छतागृहांना कुलूप लावण्यात आले आहे, तर काही ठिकाणी पाण्याचा पुरवठा बंद करण्यात आला आहे अशी माहिती पवार यांनी एक्स पोस्टवर शेअर केली आहे.

पिण्याच्या पाण्याचा पुरवठा थांबवला?

आंदोलकांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्यात अडथळे आणले जात असल्याची माहिती पवार यांनी दिली आहे. सामाजिक संघटनांकडून आंदोलनस्थळी पाठवली जाणारी मदतसुद्धा ब्लॉक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे अशी माहिती पवार यांनी दिली आहे.

खाऊगल्ल्या व हॉटेल्स बंद?

आझाद मैदान परिसरातील खाऊगल्ल्या, टपऱ्या, छोटे उपहारगृह व हॉटेल्स बंद ठेवण्याचे अलिखित आदेश असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आंदोलनासाठी आलेल्या हजारो नागरिकांना अन्न-पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

आंदोलनकर्त्यांचा सूर असा आहे की 

    शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारे आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलो आहोत. आम्हीही माणसं आहोत, नागरिक आहोत. पण सरकारला माणुसकी विसरली आहे काय? असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.मूलभूत सोयी नाकारून आंदोलनकर्त्यांना दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केला जात आहे असा सवाल पवार यांनी केला आहे.

    प्रशासनाकडे मागणी?

    आंदोलनकर्त्यांनी आणि सामाजिक संघटनांनी सरकारकडे आवाहन केले आहे की,त्वरित पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, सामाजिक संस्थांना मदत पोहोचविण्यास परवानगी द्यावी,तसेच आंदोलनाबाबत सरकारने संवादाचे दार खुले ठेवावे अशी पोस्ट रोहित पवार यांनी शेअर केली आहे.