मुंबई. Dr Armida Fernandez Padma Shri: भारतात पहिली ह्यूमन मिल्क बँकची सुरूवात एका मोठ्या सामाजिक बदलांचे उदाहरण म्हणून पाहिले जात आहे. ही बँक अशा नवजात शिशूंसाठी वरदान ठरत आहे ज्यांचा जन्म प्रिमॅच्योर आहे किंवा ज्यांची आई गंभीर आजाराने ग्रस्त आहे. अशा मुलांची इम्यूनिटी शक्ती खूपच कमजोर असते. अशा मुलांसाठी आईचे दूध जीवन आणि मृत्यू दरम्यानचे अंतर ठरू शकते. भारतात ह्यूमन मिल्क बँकची सुरुवात मुंबईतील प्रसिद्ध पीडियाट्रिशियन डॉक्टर आर्मिडा फर्नांडिस यांनी केली. त्यांनी पाहिले की, जन्मानंतर केवळ आईचे दूध मिळाले नसल्याने अनेक नवजात शिशूंना आपला जीव गमवावा लागत आहे. याच वेदनेने त्यांना दूध बँक स्थापन करण्यासाठी प्रेरित केले.

काय असते ह्यूमन मिल्क बँक-

ह्यूमन मिल्क बैँक ब्लड बँक प्रमाणेच आहे. येथे दान केलेले आईचे दूध सुरक्षित पद्धतीने स्टोर केले जाते व गरजवंत बाळांपर्यंत पोहोचवले जाते. यासाठी डॉक्टर आर्मिडा फर्नांडिस यांचे स्वप्न व त्यासाठी केलेला वर्षानुवर्षांचा संघर्ष कारणीभूत आहे. याच योगदानासाठी त्यांना यंदाचा पद्म श्री पुरस्कार मिळाला आहे. ह्यूमन मिल्क बँकेत निरोगी आई स्वेच्छेने आपले अतिरिक्त दूध दान करते. या दूधाची तपासणी करून सुरक्षित असल्याची खात्री केली जाते. त्यानंतर गरजेनुसार रुग्णालयात दाखल नवजात शिशूंना हे दूध पुरवले जाते. 

डॉ. फर्नांडीस यांना कशी मिळाली मिल्क बँकची प्रेरणा?

आर्मिडा फर्नांडिस यांचा जन्म गोव्यातील आहे. 1972 सालची गोष्ट आहे, जेव्हा डॉ. आर्मिडा मुंबईतील सायन रुग्णालयात नियोनॅटोलॉजी विभागाच्या डीन होत्या. त्यावेळी त्यांनी पाहिले की, अनेक नवजात शिशू आजारपणामुळे मरत आहेत. या बाबीचा खोलात विचार केल्यानंतर समजले की, बाळांमध्ये दस्त आणि इन्फेक्शन्सची समस्या खूप अधिक आहे. जी आईचे दूध न मिळाल्यामुळे बाहेरील दूध घेतल्याने होत आहे. या समस्येवर उपाय शोधताना त्यांचा मनात विचार आला की, प्रत्येक नवजात बाळाला ब्रेस्ट मिल्क मिळेल, मग ते कोणत्याही आईचे का असेना..

त्यांना समजले की, आईच्या दूधात असणारे कोलोस्ट्रम मुलांना सर्व प्रकारच्या संक्रमाणापासून वाचवण्यासोबच बाळाची रोग प्रतिकार शक्ति आणि पचन शक्तीही  मजबूत करते. विशेष करून एक ते सवा महिन्याच्या बाळांना आईचे दूध मिळणे खूपच आवश्यक आहे. यामुळे बाळाचे वजन, ब्लड शुगरही संतुलित राहते.

    त्यानंतर डॉ. फर्नांडीस यांनी निरोगी स्तनपान करणाऱ्या आईना अतिरिक्त दूध दान करण्याचे आवाहन केले. यानंतर अशा मुलांनाही योग्य दूध मिळू लागले ज्यांना जन्मदात्रींना दूध येत नव्हते. यानंतर डॉ. आर्मिडा यांनी अशी व्यवस्था सुरू करण्याचा विचार केला की, दूध साठवणूक करण्यासाठी मिल्क बँक तयार केली पाहिजे. जेणेकरून दान केलेले दूध काही दिवसांपर्यंत बाळांना पुरवता येऊ शकेल. त्यानंतर सायन रुग्णालयात 1989 मध्ये आशियातील पहिली ह्यूमन मिल्क बँक स्थापित केली गेली. 

    नवजात बाळांच्या मृत्यू दरात कमी, मुलांचे आरोग्य सुधारू लागल्यानंतर मुंबईतील अन्य रुग्णालयातही ह्यूमन मिल्क बँक सुरू केले गेले. काही काळानंतर रोटरी क्लबच्या सहकार्याने ही पद्धत देशभर पसरली. आज मोठ्या संख्येने बाळांना स्तनपान करणाऱ्या महिला अतिरिक्त दूध दान करतात. 

    डॉ. आर्मिडा यांनी मिल्क बँकनंतर स्नेहा म्हणजेच सोसायटी फॉर न्यूट्रिशन, एज्युकेशन अँड हेल्थ अॅक्शन, SNEHA ची स्थापना केली. ही संस्था मातृ तसेच नवजात आरोग्य, बाल पोषण आणि महिलांच्या विरोधात हिंसा सारख्या मुद्यांवर काम करते.