एजन्सी, मुंबई. Devendra Fadnavis on Operation Sindoor: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ऑपरेशन सिंदूर केल्याबद्दल भारतीय सशस्त्र दलांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आणि क्षेपणास्त्र हल्ल्याच्या व्हिडिओ फुटेजमध्ये संशयाला जागा नाही, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून, भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केले, ज्यात बहावलपूरचा जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला आणि लष्कर-ए-तैयबाचा मुरीदके तळ यांचा समावेश आहे.
एअरस्ट्राइकचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध
"या स्ट्राइकबद्दल आपण भारतीय सशस्त्र दलांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करूया. हा एक अचूक स्ट्राइक होता ज्याने नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यावेळी, एअरस्ट्राइकचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहे, ज्यामुळे कोणालाही त्याचा पुरावा मागण्याची संधी नाही." असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भारतीय सैन्यदल आणि पंतप्रधान @narendramodi यांचे अभिनंदन. #ऑपरेशनसिंदूर च्या माध्यमातून हवाई हल्ले करुन दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देत त्यांचे तळ उध्वस्त करण्यात आले. सर्व भारतीयांसाठी आजचा दिवस अभिमानाचा आहे - मुख्यमंत्री @Dev_Fadnavis #IndianArmy#OperationSindoor pic.twitter.com/oCxxAVJqNk
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 7, 2025
हेही वाचा - Operation Sindoor: देशभक्तीची भावना जागृत करणारे सर्जिकल स्ट्राईकवर आधारित आहेत हे 5 चित्रपट
हल्ला भारत सहन करणार नाही
हा देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगून ते म्हणाले की, या हल्ल्याने दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताचा दृढनिश्चय दर्शविला. आमच्यावरील हल्ला भारत सहन करणार नाही. त्याचा योग्य बदला घेतला जाईल आणि आम्ही आज ते केले," असे त्यांनी सांगितले.
'ऑपरेशन सिंदूर', लष्करी हल्ल्याचे नावच मोहिमेचे गांभीर्य आणि महत्त्व दर्शवते, जे या हल्ल्यामागील खोल राष्ट्रीय भावनेकडे संकेत देते, असंही ते म्हणाले.